OMG! लूक असा की पाहतच राहाल! Boult चे क्लासी हेडफोन भारतात लाँच, इतकी आहे किंमत
Boult FluidX आणि Boult FluidX Pro ओवर-द-ईयर हेडफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 40mm बेस-बूस्टेड ड्राइवर्स आणि IPX5 वॉटर रेजिस्टेंस रेटिंग आहे. दोन्ही हेडफोन्स अॅक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) आणि एनवायरनमेंटल नॉइज कँसिलेशन (ENC) सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. Boult FluidX ची बॅटरी लाईफ 60 तासांची आहे, तर Pro मॉडेलची बॅटरी लाईफ 70 तासांची आहे. हेडफोन्स फास्ट चार्जिंग देखील ऑफर करतात, असं कंपनीने सांगितलं आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Boult FluidX आणि FluidX Pro ची किंमत अनुक्रमे 5,999 रुपये आणि 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच FluidX ला Amazon वर 2,299 रुपये आणि FluidX Pro ला 2,499 रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. बेस वर्जन ब्लॅक, ग्रीन, आणि आइवरी व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर प्रो व्हेरिअंट रेवेन ब्लॅक आणि स्किन बेज शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Boult FluidX आणि FluidX Pro मध्ये अमेझिंग आणि ओवर-ईयर डिझाईन देण्यात आली आहे. या हेडफोन्सला क्लासी लूक आहे, ज्यामध्ये पॅडेड, रेक्टेंगुलर ईयरकप्स आहे, जे रोटेट करतात आणि राउंडेड कॉर्नर्ससह येतात. यामध्ये कुशन्ड, अडजस्टेबल आणि फोल्डेबल हेडबँड्स देखील आहेत. दोन्ही मॉडेल्स IPX5 वॉटर रेजिस्टेंट आहेत.
Boult FluidX and FluidX Pro Headphones Launched in India With ANC, Up to 70 Hours of Battery Life 👀#boult pic.twitter.com/5xLeGbXJZf
— 𝑺𝒂𝒎𝒂𝒓𝒕𝒉 𝑨𝒓𝒐𝒓𝒂 (@Technifyzer) July 3, 2025
Boult चे FluidX आणि FluidX Pro हेडफोन्स 40mm बेस-बूस्टेड ड्राइवर्ससह BoomX टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात, जे ऑडियो डेप्थ आणि डायनामिक बेस वाढवण्याचा दावा करतात. हे ANC आणि ENC फीचर्स सपोर्ट करतात, जो नॉइज डिस्टर्बेंस कमी करण्यासाठी मदत करतो. दोन्ही Boult FluidX आणि FluidX Pro हेडफोन्समध्ये डेडिकेटेड Combat Gaming Mode आहे, जो 60ms पर्यंत लो लेटेंसीला सपोर्ट करतो, जेणेकरून ऑडियो-विजुअल लॅग कमी होईल. हे Bluetooth 5.4 आणि Blink & Pair कनेक्टिविटी ऑफर करतात. यामध्ये इंट्यूटिव टच कंट्रोल्स आणि वॉइस असिस्टेंट सपोर्ट देखील आहे.
Boult FluidX Pro हेडफोन्स ANC शिवाय एकदा चार्ज केल्यास 70 तासांची बॅटरी लाईफ देतात, असा दावा कंपनीने केला आहे. Boult FluidX हेडफोन्स 60 तासांपर्यंत प्लेबॅक देतात. कंपनीच्या मते, 10 मिनिटांच्या जलद चार्जिंगमुळे Pro मॉडेलला 5 तासांचा वापर मिळतो आणि मानक आवृत्तीला 3 तासांचा वापर मिळतो.