
BSNL Recharge Plan: इंटरनेट स्पीडची चिंता संपली! बीएसएनएलच्या 100 Mbps प्लॅनमध्ये मिळणार मोफत ओटीटी अन् बरंच काही... वाचा सविस्तर
भारतातील सुमारे प्रत्येक शहरात बीएसएनएलने त्यांची ब्रॉडबँड सर्विस सुरु केली आहे. बीएसएनएल कंपनी BharatNet प्रोजेक्टच्या मदतीने ग्रामीण भागांमध्ये वेगाने विस्तार करत आहे. यामुळे कंपनीच्या यूजर्स संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कंपनीच्या 100 Mbps वाल्या ब्रॉडबँड प्लॅनची किंमत किती आहे आणि या प्लॅनमध्ये कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
बीएसएनएलच्या 100 Mbps वाल्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ओटीटी फायदे ऑफर केले जातात. या प्लॅनची किंमत केवळ 699 रुपये प्रति महिना आहे. हा देशातील परडवणाऱ्या 100 Mbps वाल्या ब्रॉडबँड प्लॅन्सपैकी एक आहे. 100 Mbps च्या स्पीडसह यूजर्सना 4000GB डेटा मिळणार आहे. जिओ आणि एअरटेलच्या फायबर कनेक्शनमध्ये डेटा लिमिट 3.3TB असते. मात्र बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये 4TB डेटा ऑफर केला जातो. 4TB डेटाची फेयर यूसेज पॉलिसी लिमिट संपल्यानंतर स्पीड 4 Mbps होणार आहे. स्पीड कमी झाला तरी देखील यूजर्स ब्रॉडबँड कनेक्शन सुरु ठेऊ शकतात.
इतकंच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनेक ओटीटी फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. यूजर्स दोन वेगवेगळ्या पॅकमधून एका पॅकची निवड करू शकतात. पहिल्या पॅकमध्ये जिओहॉटस्टार, हंगामा, लायन्सगेट, शेमारूमी आणि एपिकऑन या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस ऑफर केला जाणार आहे. तर दुसऱ्या पॅकमध्ये झी 5 आणि सोनीलिव्हचा ॲक्सेस मिळणार आहे. लक्षात ठेवा की, हा एक मंथली पॅक आहे आणि प्लॅनचे नाव फायबर बेसिक प्लस ओटीटी असे आहे. या सर्व फायद्यांसह यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. व्हॉईस कॉल्स लँडलाईन इंस्ट्रूमेंटद्वारे केली जाणार आहेत. लँडलाईन इंस्ट्रूमेंट यूजर्सना स्वत:ला खरेदी करावे लागणार आहे.