अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज... किंमत खिशाला परवडणारी
ऑनरने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB या व्हेरिअंटची किंमत QAR 999 म्हणजेच सुमारे 23,500 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत QAR 1,099 म्हणजेच सुमारे 25,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन डेझर्ट गोल्ड, वेल्वेट ब्लॅक आणि मेटिअर सिल्व्हर या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. इतर देशांमध्ये हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप शेअर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य: Honor)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 6.87 इंच टीएफटी LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एचडी+ रेजोल्यूशन, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1020 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीनमध्ये डायनॅमिक डिमिंग आणि आय कंफर्ट सारखे काही मोड्स देखील देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये एक डेडिकेटेड AI बटण देखील पाहायला मिळणार आहे. या बटणच्या मदतीने तुम्ही एआय मेमरी, सर्कल टू सर्च, एआय इरेजर, एआय सारांश आणि स्मार्ट शिफारसी सारखे फीचर्स क्विक एक्सेस करू शकता.
दमदार परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे डिव्हाईस 6GB/128GB आणि 8GB/256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदी करू शकता. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 16 बेस्ड मॅजिकओएस 10 आहे. या डिव्हाईसमध्ये रॅम टर्बो फीचर देखील दिले आहे, जे स्टोरेजचा काही भाग व्हर्च्युअल रॅम म्हणून वापरते.
ऑनर एक्स 7 ई प्लस 5G मध्ये 8100mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 45W सुपरचार्ज फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन -30°C ते 50°C पर्यंत तापमानात देखील काम करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, दीर्घकाळ वापरानंतरही बॅटरी तिची 80 टक्क्यांहून अधिक क्षमता टिकवून ठेवू शकते.
फोटोग्राफी लवर्ससाठी नव्या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचाा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्यासोबत एक सेकेंडरी सेंसर देखील दिले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचाा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर्स, एनएफसी, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, ब्लूटूथ 5.1 यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये IP68, IP69 आणि IP69K रेटिंग दिली आहे.






