
आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन... डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
भारती एअरटेलच्या 2,249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, एकूण 30GB चा 4G डेटा आणि 3,600 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनची सर्विस व्हॅलिडिटी संपूर्ण 365 दिवसांची आहे. हा प्लॅन विविध फायद्यांसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 12 महिन्यांची व्हॅलिडीटी असलेला ॲडोबी एक्सप्रेस प्रिमियम समाविष्ट आहे, ज्यांची किंमत सुमारे 4,000 रुपये आहे.
याशिवाय, यामध्ये ‘एअरटेल सेफ नेटवर्क’ चा फ्री ॲड-ऑन मिळणार आहे, ज्यामुळे सुनिश्चित होते की, तुमच्या फोन कॉलिंग आणि एसएमएसचा अनुभव पूर्णपणे सुरक्षित राहते. यासोबतच, यामध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचा ॲक्सेस देखील मिळणार आहे, जो मोफत एंटरटेनमेंट कंटेंटसह येतो. कंपनीने हा प्लॅन विशेषत: अशा लोकांसाठी लाँच केला आहे, ज्यांना कमी पैशांत वर्षभराची व्हॅलिडीटी पाहिजे आहे आणि जे लिमिटेड डेटाचा वापर करू शकतात.
तुम्हाला वर्षभराची व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन पाहिजे आहे आणि डेटाची देखील गरज नाही तर तुम्ही 1,849 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची निवड करू शकता. कंपनीचा 1,849 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील संपूर्ण 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 3,600 एसएमएस बंडल मिळणार आहे. पण लक्षात ठेवा की, या प्लॅनमध्ये कोणताही डेटा ऑफर केला जाणार नाही. 1,849 रुपयांच्या या प्लॅनसोबत मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये ग्राहकांना ‘ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम’, ‘एअरटेल सेफ’ आणि 30 दिवसांसाठी मोफत ‘हॅलोट्यून्स’ मिळतात.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी मिळते.
Ans: या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, एकूण ३०GB डेटा आणि ३,६०० SMS मिळतात. याशिवाय, Adobe Express Premium, Airtel Safe Network आणि Airtel Xstream Play यांसारखे अतिरिक्त फायदे दिले जातात.
Ans: नाही. दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅनमध्ये 5G डेटा बेनिफिट मिळत नाही. यामध्ये एकूण ३०GB 4G डेटा दिला जातो.