eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा 'हे' महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान
तुम्ही तुमच्या फोनमध्ये ई-सिमचा वापर करत असाल आणि तुम्ही तो फोन विकण्याचा विचार करत असाल तर थांबा. ई-सिम सपोर्ट असणारा कोणताही स्मार्टफोन विकण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण इतर स्मार्टफोन्सप्रमाणे केवळ फॅक्ट्री रिसेट करून तुम्ही स्मार्टफोन विकला तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
फिजिकल सिम एक प्री-प्रोग्राम्ड असते. फिजिकल कार्ड फोनमध्ये असलेल्या एका स्पेशल स्लॉटमध्ये इन्सर्ट करावे लागते. मात्र ई-सिमला अशा कोणत्याही सिम स्लॉटची गरज नसते. एका एक इम्बेडेड सिम कार्ड म्हणजेच ई-सिममध्ये नेटवर्क क्रेडेंशियल डाउनलोड केले जाते. एकदा डाऊनलोड केल्यानंतर ई-सिम फोनमध्ये कायमस्वरुपी राहते. फिजिकल सिम कार्डच्या तुलनेत ई-सिम जास्त सुरक्षित मानले जाते. ई-सिम फोनच्या IMEI नंबरसोबत लिंक केले जाते, ज्यामुळे सुरक्षा अधिक मजबूत होते.
जर तुम्ही तुमचा जुना फोन विकण्याचा विचार करत असाल ज्यामध्ये ई-सिम सपोर्ट आहे, तर तुम्हाला काही महत्त्वाची काम करणं गरजेचं आहे. तुमचा फोन विकण्यापूर्वी सर्वात आधी डेटा बॅकअप घ्या. कारण सध्याच्या काळात आपले आयुष्य पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये वैयक्तिक, व्यवहारिक डिटेल्स आणि इतर महत्त्वाचा डेटा स्टोअर केलेला असतो. यामुळे या सर्व डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे.
बॅकअप घेतल्यानंतर फोनमधून डेटा डिलीट होण्याची तुम्हाला चिंता राहणार नाही. यानंतर फोनमधील सोशल मीडिया, बँकिंग आणि दुसऱ्या सर्व ॲप्समधून लॉगआऊट करा. यामुळे जेव्हा तुम्ही नवीन स्मार्टफोनमध्ये लॉगिन कराल आणि तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त, तुम्ही अधिक चांगल्या मोबदल्यासाठी फोन दुरुस्त करूनही घेऊ शकता.
या सर्व कामांव्यतिरिक्त, जर तुम्ही ई सिम वाला स्मार्टफोन विकणार असाल आणखी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. हा फोन विकण्यापूर्वी तुमचे ई-सिम प्रोफाइल काढून टाका. कारण फॅक्ट्रि रिसेट केल्यानंतर ई-सिम हटवले जाण्याची शक्यता फार कमी असते. यासाठी, तुमचे ई-सिम प्रोफाइल नवीन फोनमध्ये ट्रांसफर करा. यानंतर प्रोफाईल डिलीट करून फोन फॅक्ट्री रिसेट करा. यामुळे तुमचा डेटा, सेटिंग्ज, फाइल्स, ई-सिम इत्यादी गोष्टी इतरांच्या हाती पडण्यापासून सुरक्षित राहतील. तसेच, तुमचा नवीन फोन सेट-अप करताना याच गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील.






