एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे
Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती
बीएसएनएलच्या वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 2,799 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षभर व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच इतर फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
बीएसएनएलच्या ॲन्युअल रिचार्ज प्लॅनची सर्वात मोठी खासियत म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडीटी. कारण असे अनेक यूजर्स असतात ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो, अशा यूजर्ससाठी दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन्स फायदेशीर ठरतात. कंपनीने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या नव्या प्लॅनबाबत माहिती दिली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 3GB हाय-स्पीड डेटा दिला जाणार आहे. त्यामुळे यूजर्सना व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा इंस्टाग्राम रिल्स स्क्रोल करण्यासाठी भरपूर डेटा मिळणार आहे.
कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स संपूर्ण देशभरात लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळणार आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे, ज्यांना इंटरनेटसह कॉलिंग आणि एसएमएस फायदे देखील पाहिजे आहेत.
बीएसएनएल ऑफर करत असलेल्या या ॲन्युअल रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 2,799 रुपय आहे. या प्रकरणात, 365 दिवसांच्या कालावधीचा विचार करता, सरासरी खर्च दररोज सुमारे ७.६७ रुपये इतका येतो. दीर्घ व्हॅलिडीटी कालावधीमुळे ग्राहकांना दरमहा रिचार्ज करण्याच्या त्रासातूनही सुटका मिळेल.
Ans: या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
Ans: होय, या प्लॅनमध्ये देशभरात लोकल आणि STD कॉल करण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाते.
Ans: या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते.






