Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 07.11.2026
Maharashtra to World Breaking News :
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर आली असून रेल्वेमंत्र्यांनी कामाचा आढावा घेत पाहणी केली. केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमाशुल्क सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवल्यामुळे बाजारात परदेशी कापसाची आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खुल्या बाजारात कापसाचे दर घसरले असून (यवतमाळच्या आर्णी बाजारात भाव ९,१०० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत), शेतकरी चिंतेत आहेत.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सहलीवर गेलेले मतदार थेट मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राज्यात काही भागांत हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असून, पुण्यात आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींवर लक्ष ठेवले जात आहे.बँकेच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर अँड एम्प्लॉइजच्या वतीने २ आणि ३ नोव्हेंबर रोजी देशव्यापी दोन दिवसांच्या लाक्षणिक उपोषण/आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.ज्येष्ठ विधिज्ञांद्वारे न्यायालयात तोंडी उल्लेख (Oral Mentioning) करण्यासंदर्भातील सुप्रिम कोर्टाचे नवीन परिपत्रक आजपासून लागू झाले आहे, ज्यामध्ये तरुण व कनिष्ठ वकिलांना प्राधान्य देण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.
02 Nov 2026 05:59 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
02 Nov 2026 05:50 PM (IST)
बदलत्या जमान्यात नात्यांमधील विश्वास कसा रसातळाला गेला आहे, याचे एक अत्यंत धक्कादायक उदाहरण सांगली जिल्ह्यातून समोर आले आहे. लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून जास्त तपास न करता लग्न ठरवणे किती महागात पडू शकते, हे एका शिक्षक कुटुंबाच्या बाबतीत घडलेल्या थरारक घटनेवरून स्पष्ट झाले आहे. सुनेच्या आणि तिच्या माहेरच्यांच्या सततच्या छळाला, आर्थिक मागणीला आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीला कंटाळून ६३ वर्षीय सासऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले आहे.
02 Nov 2026 05:43 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सहा प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या भेटीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. लक्षणीय बाब म्हणजे या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हेच उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीत पक्षाची महाराष्ट्रातील राजकीय रणनीती आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
02 Nov 2026 05:25 PM (IST)
भारतातली सगळ्यात मोठी डिपॉझिटरी NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केलाय. कंपनीचा धंदा दिवसेंदिवस वाढतोय आणि नफा पण वाढतोय.धंद्यात मोठी वाढ30 सप्टेंबर 2026 पर्यंत कंपनीचे DP म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट 320 झाले आहेत. त्यांना 53,846 सेवा केंद्रांचा सपोर्ट आहे. कंपनीचा मार्केट शेअर पण वाढतोय. BO म्हणजे लाभार्थी मालक खात्यांचा मार्केट शेअर या तिमाहीत 17.2% होता.
02 Nov 2026 05:10 PM (IST)
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित इमिग्रेशन धोरणामुळे H-1B आणि L-1 व्हिसावर (H-1B Visa) काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नव्या प्रस्तावानुसार, व्हिसा एक्स्टेंशन अर्जांवर निर्णय घेताना अमेरिकी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना पूर्वीची व्हिसा मंजुरी आधार मानणे बंधनकारक राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक एक्स्टेंशन अर्जाची नव्याने तपासणी केली जाऊ शकते.
02 Nov 2026 04:57 PM (IST)
देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Road Safety Training and Research Institute) सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. केंद्राची उभारणी दर्जेदार, अत्याधुनिक आणि प्रभावी व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
02 Nov 2026 04:47 PM (IST)
अवघ्या दोन दिवसावर दिवाळी सण येऊन ठेपला असतान, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि अन्य न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणारे हे आंदोलन तीन टप्प्यांत करण्यात येणार असून, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये या आंदोलनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
02 Nov 2026 04:37 PM (IST)
मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरातील अत्यंत उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या ठाकूर व्हिलेज येथून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील ‘अल्पिन टॉवर’ या टोलेजंग निवासी इमारतीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
02 Nov 2026 04:27 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी INDIA आघाडी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत चीनकडून फंडिंग मिळत असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत चीनच्या फंडिंगच्या गोष्टी नंतर करा, आधी देशाच्या सीमेकडे लक्ष द्या, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांना सुनावलं. गेल्या काही दिवसांपासून भारत - चीन सीमेवर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या विधानामुळे चर्चा रंगू लागल्या आहेत.
02 Nov 2026 04:17 PM (IST)
यूजीसी नेट डिसेंबर 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेची मुदत संपली आहे. फॉर्म भरताना काही चूक झाली असल्यास आता त्यात सुधारणा करण्याची संधी उपलब्ध आहे, एनटीएने ऑनलाईन अर्जात सुधारणा करण्यासाठी करेक्शन विंडो सुरु केली आहे. फॉर्ममधील स्पेलिंगची चूक किंवा माहितीतील चुक भविष्यात मोठी समस्या ठरू शकते. म्हणून एनटीएने यात सुधारणा करण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. वाचा सविस्तर...
02 Nov 2026 04:07 PM (IST)
महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेवरून सध्या वाद रंगला आहे. या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तिच्या या व्हिडीओवर भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या एक्स पेजवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलीट केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता दियानेही प्रतिक्रिया दिली आहे. नेमका वाद काय? जाणून घ्या...
02 Nov 2026 03:59 PM (IST)
Auto Rickshaw Theft: वांगणी परिसरातून चोरीला गेलेल्या एका ऑटोरिक्षाचा कुळगाव पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या आठ दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर शहरातून दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेली ऑटोरिक्षाही यशस्वीरित्या हस्तगत केली आहे.
02 Nov 2026 03:55 PM (IST)
NCP News : राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चाना उधाण आले आहे. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला अपयश आल्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याच्या चर्चा आहेत. अश्यातच, आता मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादीच्या टॉपच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
02 Nov 2026 03:50 PM (IST)
Mumbai Crime News: दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाईन ॲपद्वारे होम क्लिनिंग सर्व्हिस बूक करणे एका ५२ वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे. घराची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनीच संधी साधून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची खळबळजनक घटना मालाड पश्चिम परिसरात घडली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही दिवसांत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
02 Nov 2026 03:45 PM (IST)
Nagpur News : दिवाळीचा सण म्हटला की गावी जाण्याची ओढ आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा आनंद काही औरच असतो. मात्र, यंदा हा आनंद प्रवाशांच्या खिशाला चांगलाच महाग पडणार आहे. दिवाळीच्या तोंडावर विमान आणि खासगी बसच्या तिकीट दरांनी मोठी झेप घेतली असून, नागपूरला येण्यासाठी प्रवाशांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. रेल्वेचे आरक्षणही फुल्ल झाल्याने चाकरमान्यांसमोर प्रवासाचे मोठे संकट उभे राहिले आहे.
02 Nov 2026 03:40 PM (IST)
Pune: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १० वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ढोले पाटील क्रिकेट अकादमीने सलग तिसरा विजय नोंदवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. साखळी फेरीतील सामन्यात ढोले पाटील अकादमीने व्हिबग्योर क्रिकेट अकादमीचा तब्बल १५२ धावांनी पराभव केला. अन्य सामन्यात व्हिबग्योर क्रिकेट अकादमीने पुणे फ्युचर स्टार्स संघावर दोन गडी राखून मात करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला.
02 Nov 2026 03:35 PM (IST)
Mahalaxmi Express Robbery: मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये (Mahalaxmi Express Robbery) मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वेगाडी थांबवली. त्यानंतर डब्यांमध्ये प्रवेश करून दोन महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेत एकूण ५२ हजार ६०० रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
02 Nov 2026 03:30 PM (IST)
शेअर मार्केटमध्ये IPO मधून कमाई करू पाहणाऱ्यांसाठी पुढचे काही महिने एकदम भारी असणार आहेत. देशातल्या 10 मोठ्या कंपन्या आता शेअर बाजारात उतरायच्या तयारीत आहेत. यात कोळसा कंपनी महानदी कोलफिल्ड्स, INOX एअर, पेमेंट कंपनी रेझरपे, हॉटेलवाला OYO अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. Upcoming IPOs India:
02 Nov 2026 03:00 PM (IST)
सातारा: सातारा जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल थेट मुख्य न्यायाधीशांच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाल्याने सोमवारी जिल्ह्याची पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. दुपारी ३.१५ वाजता न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा या ई-मेलमधून देण्यात आला होता. या गंभीर प्रकारानंतर न्यायालय प्रशासनाने तातडीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याने न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली.(Satara District Court)
02 Nov 2026 02:55 PM (IST)
आजच्या काळात तंत्रज्ञान जितक्या वेगाने पुढे जात आहे, तितकीच मानवाची अंतराळातील महत्त्वाकांक्षाही वाढत आहे. एकेकाळी केवळ चंद्रावर (Moon Reactor) पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहणारा मनुष्य आता तिथेच आपले बस्तान मांडण्याच्या तयारीत आहे. सध्या जागतिक राजकारणातील तीन प्रमुख महासत्ता अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यामध्ये चंद्रावर अणुभट्ट्या उभारण्यासाठी एक नवी आणि अटीतटीची शर्यत सुरू झाली आहे. अंतराळ संशोधनाच्या इतिहासात हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून, यामागे केवळ वैज्ञानिक प्रगती नव्हे तर भविष्यातील भू-राजकीय आणि आर्थिक वर्चस्वाचे मोठे कारण दडलेले आहे. या तिन्ही देशांना चंद्रावर आपले स्थायी तळ स्थापन करायचे आहेत, जिथे शास्त्रज्ञ दीर्घकाळ राहून संशोधन करू शकतील. यासाठी लागणारी अखंड आणि सुरक्षित वीज केवळ अणुभट्ट्यांद्वारेच मिळू शकते, म्हणूनच या प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
02 Nov 2026 02:50 PM (IST)
ONGC Apprentice Recruitment 2026: सरकारी क्षेत्रात अप्रेंटिसशिप करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेडने देशातील तरुणांसाठी अप्रेंटिस पदांवर बंपर भरती काढली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये एकूण ३०४७ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या तारखा, पात्रता आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
02 Nov 2026 02:45 PM (IST)
GMC Hingoli Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करत मेडिकलच्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे ‘अभ्यागत अध्यापक’ (Visiting Faculty) या संवर्गातील रिक्त पदे एकत्रित मानधनावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, एकूण ७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये औषधवैद्यकशास्त्र (२ पदे), शल्यचिकित्साशास्त्र (२ पदे), स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (२ पदे) आणि कान, नाक व घसाशास्त्र (१ पद) या विविध वैद्यकीय शाखांचा समावेश आहे.
02 Nov 2026 02:40 PM (IST)
IND Vs NZ: येत्या बुधवारपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंडमदये पाच सामन्यांची वनडे सिरीज सुरू होणार आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. नुकत्याच झालेल्या टी 20 सिरीजमध्ये भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय वनडे संघाचा देखील आत्मविश्वास उंचवलेला आहे. आता आपण या दोन्ही संघाची हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.
दोन्ही संघाचा इतिहास पाहिल्यास भारत आणि न्यूझीलंड हे संघ वनडे क्रिकेटमध्ये अत्यंत मजबूत आणि शानदार खेळ करण्यासाठी ओळखले जातात. दोन्ही संघ एकमेकांना नेहमीच टक्कर देत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान आता पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये कोण बाजी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारी पाहुयात.
02 Nov 2026 02:30 PM (IST)
नीता परब, मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-II ने सागर डॅश याला अटक केली आहे. तो ‘ऑल पॅनेल एक्सचेंज’ (ए पीएक्स) द्वारे चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन सट्टेबाजी आणि सायबर-फसवणूक नेटवर्कशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्याच्यावर सहकारी बँका, बनावट कंपन्या (शेल एंटिटीज) आणि क्रिप्टोकरन्सी चॅनेलद्वारे शेकडो कोटी रुपयांची गुन्हेगारी मालमत्ता वळवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (ED Arrest)
02 Nov 2026 02:20 PM (IST)
Phulwara Teaser:लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो घुंगरांचा आवाज, ढोलकीचा ठेका आणि अस्सल मराठी मातीचा सुगंध! ‘नटरंग’ हा चित्रपट आठवतोय का? १६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं होतं. गुणा आणि त्याची लावणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता तब्बल १६ वर्षांनंतर दिग्दर्शक रवी जाधव आणि झी स्टुडिओज पुन्हा एकदा लावणीच्या विश्वात घेऊन येत आहेत नवा सिनेमा. या चित्रपटाचं नाव आहे ‘फुलवरा’. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याने सिनेरसिकांची उत्सुकता वाढवली आहे.
02 Nov 2026 02:10 PM (IST)
Beed District Consumer Protection Council: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २९ ऑगस्ट २०२२ च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार, बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकूण २४ अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, तालुक्यातील तहसील कार्यालयांमार्फत इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत विविध क्षेत्रातील घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामध्ये नगरपालिका (२), कृषी उत्पन्न बाजार समिती (२), ग्राहक संघटना (१०), शाळा किंवा महाविद्यालये (२), वैद्यकीय व्यावसायिक (२), व्यापार व उद्योग (२), पेट्रोल व गॅस विक्रेते (२) आणि शेतकरी प्रतिनिधी (२) अशा एकूण २४ जागांसाठी अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार आहे.
02 Nov 2026 01:55 PM (IST)
शनिवारची ती रात्र मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी आणि पोलिस यंत्रणेसाठी काळरात्र ठरली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास अंजनारी घाट पुलाजवळ काजळी नदीपात्रात एक वाहन खाली कोसळल्याची (Accident) प्राथमिक माहिती लांजा पोलिस ठाण्याकडून हातखंबा महामार्ग वाहतूक मदत केंद्राला देण्यात आली होती. तत्काळ खातरजमा करून मदतकार्य पोहोचवण्यासाठी हातखंबा वाहतूक केंद्राचे पोलीस अंमलदार संतोष गायकवाड आणि पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे हे आपली शासकीय बोलेरो जीप (क्र. एम एच ०८, बीई-३५६१) घेऊन अंजनारीच्या दिशेने रवाना झाले होते. अंजनारी नदीजवळ पोहोचली असतानाच, त्याच दरम्यान पाठीमागून गोव्याच्या दिशेने लोखंडी सळ्या भरून जाणारा एक भरधाव अवजड कंटेनर तिथे आला.
02 Nov 2026 01:45 PM (IST)
सरकारी नोकरीची तयारी करत मेडिकलच्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे ‘अभ्यागत अध्यापक’ (Visiting Faculty) या संवर्गातील रिक्त पदे एकत्रित मानधनावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, एकूण ७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये औषधवैद्यकशास्त्र (२ पदे), शल्यचिकित्साशास्त्र (२ पदे), स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (२ पदे) आणि कान, नाक व घसाशास्त्र (१ पद) या विविध वैद्यकीय शाखांचा समावेश आहे.
02 Nov 2026 01:35 PM (IST)
नांदेड इथे बु. जिल्ह्यातील वाडी उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना गुरांसाठी चारा वाटप तसेच पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या मदतीचे धनादेश देण्यात आले. महिलांना शिलाई मशीन तसेच विद्यार्थिनींना सायकलचे वितरणही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मंत्रिमंडळाने दिले असले तरी त्यांच्यासाठी दुष्काळग्रस्त परिस्थिती नक्कीच भयावह आहे.
02 Nov 2026 01:30 PM (IST)
आयपीएल २०२७ ची तयारी सुरू झाली आहे. सर्व संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी (रिटेन लिस्ट) कधी जाहीर करतील, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आयपीएलच्या चॅम्पियन संघांपैकी एक असलेल्या सीएसकेमध्ये मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. गेल्या लिलावात जास्त किमतीत खरेदी केलेल्या दोन खेळाडूंपैकी एक किंवा दोघांनाही संघ रिलीज करू शकतो. यामुळे संघाच्या तिजोरीत वाढ होईल आणि या निधीचा वापर अतिरिक्त खेळाडू खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. येथे आपण प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्याबद्दल बोलत आहोत, ज्यांना उदयोन्मुख तारे मानले जाते.
02 Nov 2026 01:25 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ‘रामायणम’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असून, चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना चित्रपटातील कलाकार प्रमोशनच्या तयारीला लागले आहेत. अशाच एका प्रमोशनल मुलाखतीदरम्यान रणबीरने केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एलॉन मस्कच्या हवेत उडणाऱ्या कारची तुलना त्याने थेट ‘रामायण’मधील पुष्पक विमानाशी केली आहे.
02 Nov 2026 01:20 PM (IST)
India Post Driver Recruitment 2026: सरकारी नोकरी शोधताय का? मग तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. भारतीय पोस्ट खात्यात ड्रायव्हर पदांसाठी भरती निघाली आहे. तामिळनाडू सर्कल, चेन्नईच्या मेल मोटर सर्व्हिसमध्ये ही भरती होत आहे. एकूण 24 जागा आहेत, स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी. फक्त 10वी पास असाल आणि तुमच्याकडे लायसन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज फक्त स्पीड पोस्टने पाठवायचा आहे आणि शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. India Post Recruitment 2026:
02 Nov 2026 01:20 PM (IST)
उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेली छत्रपती संभाजीनगर येथील ३४ वर्षीय तरुणी मुग्धा अविनाश देशमुख हिचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. लंडनहून परतल्यानंतर कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता ती पुण्यात एकटीच का राहत होती, याबाबतचे रहस्य अधिक गडद झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
02 Nov 2026 01:15 PM (IST)
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-II ने सागर डॅश याला अटक केली आहे. तो ‘ऑल पॅनेल एक्सचेंज’ (ए पीएक्स) द्वारे चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन सट्टेबाजी आणि सायबर-फसवणूक नेटवर्कशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्याच्यावर सहकारी बँका, बनावट कंपन्या (शेल एंटिटीज) आणि क्रिप्टोकरन्सी चॅनेलद्वारे शेकडो कोटी रुपयांची गुन्हेगारी मालमत्ता वळवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
02 Nov 2026 12:48 PM (IST)
दुचाकीची चावी गाडीला विसरल्याची संधी साधत अज्ञात चोराने एका महिलेची होंडा कंपनीची मोपेड स्कूटर पळवून नेली. ही घटना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) दुपारी हेल्थ स्टोअर्स मेडिकलजवळ, आळंदी रोड, भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची अॅक्टिवा दुचाकी (एमएच 14 एनएफ 9354) आळंदी रोड भोसरी येथील हेल्थ स्टोअर्स या मेडिकल दुकानासमोर पार्क केलेली होती. गाडीची चावी तशीच गाडीत विसरली गेल्याने, फिर्यादीची दुचाकी अज्ञात इसमाने चोरट्याने परस्पर चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
02 Nov 2026 12:36 PM (IST)
रिक्षाने जात असलेल्या तिघांना अडवून बेदम मारहाण करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीसीएस चौक, चऱ्होली खुर्द येथे घडली. याप्रकरणी आकाश गोविंद शेडगे (२५, भोसरी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश सुदेश नितनवरे (२४, वडगाव घेनंद), प्रविण रघुनाथ पवार (४१, नामपूर), रवि बाबाराव देशमुख (३७, वाकडवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे त्यांचे मित्र अथर्व संदीप गायकवाड आणि जीवन शाम रूपनर यांच्यासह त्यांच्या रिक्षातून जात असताना, नमूद ठिकाणी आरोपींनी त्यांच्या रिक्षासमोर येऊन त्यांना थांबवले. त्यानंतर आरोपींनी हाताने व हॉकीच्या लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
02 Nov 2026 12:24 PM (IST)
लोकप्रतिनिधित्व म्हणजे केवळ राजकीय जबाबदारी किंवा विकासकामांपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची सामाजिक बांधिलकी असते. याच जाणिवेतून आणि सेवाभावाच्या संस्कारांतून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बार्शी, भूम-परांडा, कळंब आणि गेवराई परिसरातील एक हजार गरजू शेतकरी कुटुंबांना महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक साहित्याचे रेशन किट आणि दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या घरात सणाचा आनंद पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ३० टन जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. दुष्काळाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत या कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आमदार जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या शहरी भागाचे प्रतिनिधित्व करत असतानाही ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी उचललेले हे पाऊल सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे.
02 Nov 2026 12:12 PM (IST)
जुन्या वादाचा राग मनात धरून दोन गटांनी एकमेकांवर हत्यारांसह हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना शनिवारी शहरातील येवला रस्त्यावरील हॉटेल शान ए मराठा व जीवनश्री कॉलनी परिसरात घडली आहे. कोयता, लोखंडी कत्ती, लोखंडी रॉड, फावड्याचा फायबर दांडा व लाकडी दांडक्यांचा वापर करीत झालेल्या या हाणामारीत ९ जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या जुन्या वादातून हा संघर्ष पेटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून २० ते २५ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 Nov 2026 11:40 AM (IST)
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि हत्येची भीषण घटना समोर आली आहे. कपड्याच्या दुकानात झालेला वाद आणि पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघा नराधमांनी धारदार शस्त्रांनी वार करून ३१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला आहे. रविवारी (ता. १) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कामेरी नाका परिसरात हा थरारक प्रकार घडला असून, या घटनेमुळे ईश्वरपूरसह आंबेडकरनगर परिसरात एकच तणाव व खळबळ उडाली आहे.
02 Nov 2026 11:35 AM (IST)
सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ बड़ौदाने (Bank of Baroda) नवीन भरती जाहीर केली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. मात्र, ही भरती सामान्य लिपिक किंवा प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी नसून, बँकेच्या आयटी (IT) विभागातील वरिष्ठ पदे भरण्यासाठी आहे.
02 Nov 2026 11:25 AM (IST)
बारामती शहरासह जिरायती पट्ट्यात आणि इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. बारामती शहरात सकाळी सात पर्यंत १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही सकाळी सव्वादहापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने एकूण पावसाची नोंद १७० मिलिमीटरच्या पुढे गेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
02 Nov 2026 11:15 AM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) देशांमध्ये सुरू असलेल्या तीव्र तणावाचा थेट परिणाम आता जागतिक व्यापारी जहाजांवर आणि सागरी वाहतुकीवर होऊ लागला आहे. विशेषतः सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) मध्ये टँकर्सना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नेव्हीने दावा केला आहे की, एका सुपरटँकरसह दोन मोठे तेल टँकर प्रतिबंधित व अनधिकृत मार्गातून जात असताना नौदल सुरुंगांवर (Naval Mines) आदळले, ज्यामुळे त्यात शक्तिशाली स्फोट झाले.
02 Nov 2026 11:12 AM (IST)
जर्नलिस्ट्सविरोधातील गुन्ह्यांसाठी निर्बंध समाप्त करण्याच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त, प्रत्येक वर्षी 2 नोव्हेंबरला जगभरात जागरूकता वाढवली जाते. पत्रकारिता हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे, परंतु अनेक देशांमध्ये पत्रकारांना हिंसक हल्ले, धमक्या आणि हत्या यांचा सामना करावा लागतो. या समस्येचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्र येणे आवश्यक आहे.
02 Nov 2026 10:55 AM (IST)
विज्ञान जगतातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. सहारा वाळवंटातील माली देशात संशोधकांना तब्बल ४.१ अब्ज वर्षे जुना मंगळाचा एक उल्कापिंड सापडला आहे. पृथ्वीवर आतापर्यंत सापडलेल्या मंगळाच्या (Mars) तुकड्यांमध्ये हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, या उल्कापिंडाच्या कसून अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात असल्याचा भक्कम पुरावा हाती लागला आहे. या नव्या संशोधनामुळे मंगळावर कधीतरी जीवसृष्टी किंवा अनुकूल परिस्थिती होती का, याविषयीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
02 Nov 2026 10:45 AM (IST)
बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान आज, २ नोव्हेंबर रोजी आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. दरवर्षी देशभरातून चाहते मुंबईतील वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरातील त्याच्या ‘मन्नत’ या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदाही शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ‘मन्नत’बाहेर जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्याच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या एका मोठ्या स्क्रीनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
02 Nov 2026 10:35 AM (IST)
तुम्हाला देखील वारंवार रिचार्ज करायला कंटाळा येतो का? दर महिना रिचार्जची तारीख लक्षात ठेवणं फार कंटाळवाणं काम आहे. खरं तर प्रत्येक स्मार्टफोन यूजरला या समस्येचा सामना करावा लागतो. पण आता तुम्ही वर्षभराची व्हॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लॅन खरेदी करून तुमची हि समस्या सोडवू शकता. असाच एक प्लॅन सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देखील त्यांच्या यूजर्ससाठी घेऊन आली आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. ज्यामुळे यूजर्सना दरमहिना रिचार्जची तारीख लक्षात ठेवण्याची गरज नसते.
02 Nov 2026 10:25 AM (IST)
अमेरिकेच्या राजकारणात (US News) आणि सुरक्षेत सध्या एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील प्रसिद्ध ‘मार-ए-लागो’ (Mar-a-Lago) निवासस्थानाजवळ तातडीने हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली. ही सुरक्षा यंत्रणा बसवल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत, या ठिकाणापासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर एक व्यावसायिक जेट विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व ९ प्रवाशांचा व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या दुहेरी घटनांमुळे संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.
02 Nov 2026 10:15 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून काही देशांवर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. भारतासह चीनवरही अमेरिकेकडून टॅरिफ आकारला जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने काँग्रेसची मंजुरी न घेता व्यापारासह विविध मुद्द्यांवर कार्यकारी आदेश काढण्याची रणनीती आखली आहे. या घडामोडींमुळे भारतासह इतर देशांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
02 Nov 2026 10:05 AM (IST)
मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर रविवारी मध्यरात्री दरोड्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी डाव साधत ऐवज लंपास केला. सातारा जिल्हा हद्दीत घडलेल्या या दरोड्याच्या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
02 Nov 2026 09:55 AM (IST)
न्यूझीलंडचा संघ ४ नोव्हेंबरपासून भारताविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा फटका बसला आहे. संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू—स्टार अष्टपैलू रचिन रवींद्र आणि मधल्या फळीतील फलंदाज मार्क चॅपमन—दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाले आहेत. विशेष म्हणजे, दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू भारताविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिकाही खेळू शकले नव्हते.






