
BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही...
भारत संचार निगम लिमिटेडने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या ऑफरची घोषणा केली आहे. बीएसएनएलच्या या फ्रीडम पॅकची किंमत केवळ 150 रुपये आहे. या पॅकमध्ये यूजर्सना संपूर्ण 30 दिवसांसाठी तीन लोकप्रिय ओटीटी ॲप्सचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. ज्यामध्ये जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि झी 5 यांचा समावेश आहे. खरं तर या पॅकची किंमत 199 रुपये आहे. मात्र फ्रीडम ऑफरअंतर्गत हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 49 रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
From thrilling finishes to unforgettable victories, catch every medal moment with the BSNL Freedom Pack. Three OTT platforms. One great offer. Upgrade now on whatsapp: 1800-4444#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia… pic.twitter.com/VHz9dscajo — BSNL India (@BSNLCorporate) July 24, 2026
कंपनीने लाँच केलेली ही ऑफर 23 जुलैपासून 30 दिवसांपर्यंत व्हॅलिड राहणार आहे. बीएसएनएलने वाय-फाय यूजर्ससाठीही ही ऑफर सादर केली आहे. या ऑफरचा लाभ नवीन आणि जुने सर्व बीएसएनएल ब्रॉडबँड आणि FTTH यूजर्स घेऊ शकणार आहेत. जर तुम्ही नवीन वायफाय कनेक्शन विकत घेणार आहात, तर तुम्ही देखील या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहात.
बीएसएनएलने गेल्या वर्षी 1 रुपयांच्या फ्रीडम ऑफरची घोषणा केली होती. ज्यामध्ये यूजर्सना केवळ 1 रुपयांत बीएसएनएल सिम मिळत होते. यामध्ये यूजर्सना एक महिन्याचे डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळणार आहे. इतकंच नाही, भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगची सुविधा दिली जाणार आहे. बीएसएनएलने काही दिवसांपूर्वी 51 रुपयांचा प्लॅन सादर केला होता. हा प्लॅन विशेषत: नवीन यूजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. यामध्ये यूजर्सना डेली 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएससह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचा फायदा मिळणार आहे. बीएसएनएलने सध्या ही ऑफर 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.
अलीकडेच, जिओने देखील त्यांच्या वायफाय यूजर्ससाठी फ्रीडम ऑफरची घोषण केली आहे. यामध्ये यूजर्सना 15 महिन्यांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 6 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. जिओने ही फ्रीडम ऑफर जिओ फायबर आणि जिओ एअरफायबर यूजर्ससाठी सादर केली आहे. गेल्या वर्षीही जिओने ‘फ्रीडम ऑफर’ जाहीर केली होती, ज्याअंतर्गत यूजर्सना विविध फायदे देण्यात आले होते.