बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज
VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
विवो टी 5 ई स्मार्टफोन 4GB + 64GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन शॅडो ग्रे आणि एयरो ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन विवोची अधिकृत वेबसाईट, फ्लिपकार्ट आणि देशातील ऑफलाइन रिटेल आउटलेट्समधून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Vivo)
Presenting the all-new T5e, with Military grade durability, longgg battery and a super smooth display, made for your #TurboLife.#vivoT5e #GetSetTurbo pic.twitter.com/nlmxJvYmlp — vivo India (@Vivo_India) July 27, 2026
विवो टी 5 ई च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाला 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
फोनमध्ये पावर देण्यासाठी यूनिसोक T7225 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 4GB पर्यंत रॅम आणि 4GB पर्यंत एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. म्हणजेच फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 ने सुसज्ज आहे आणि यामध्ये टेक्स्ट जनरेशनसाठी एआय क्रिएशन, डॉक्यूमेंट मॅनेजमेंटसाठी वीवो डॉकमास्टर आणि इमेज एडिटिंगसाठी एआय कटआउट जसे एआय-पावर्ड फीचर्स देखील देण्यात आले आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी दिली आहे, जी 15W फास्ट चार्जिंग, रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि बॅटरी हेल्थ प्रोटेक्शनला सपोर्ट करते. विवोने दावा केला आहे की, हा फोन चार वर्षांपर्यंत आपली परफॉर्मंस टिकवून ठेवू शकतो. याशिवाय या डिव्हाईसमध्ये पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा, ओल्या हाताने स्पर्श करण्याची सुविधा, बाजूला लावलेला फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.






