
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा बजेट प्लॅन! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार डेली 2.5GB डेटा... किंमत 300 रुपयांहून कमी
Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान… सरकारने दिला इशारा
बीएसएनएलने आतापर्यंत त्यांच्या यूजर्ससाठी अनेक रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत कमी आणि यामध्ये मिळणारे फायदे खूप जास्त आहेत. खरं तर बीएसएनएल परवडणाऱ्या किंमतीत यूजर्ससाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. यूजर्सना कमी किंमतीत जास्त फायदे मिळावे आणि नवीन यूजर्स जोडले जावेत, यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन अतिशय फायद्याचे ठरतात. याशिवाय कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी लिमिटेड टाईम ऑफर्स देखील घेऊन येत असते, ज्यामध्ये कधी 1 रुपयांत नवीन सिमकार्ड दिले जाते तर कधी रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यास मोफत सिम ऑफर केले जाते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता देखील कंपनी एका नव्या रिचार्ज प्लॅनसह सज्ज झाली आहे. 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या या प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्ससाठी भरपूर डेटा देखील ऑफर केला जातो. कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत आणि यामध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
Stay connected with one of BSNL’s value-packed prepaid recharge plans. Get 2.5 GB daily data, unlimited voice calls, 100 SMS/day, and 30 days validity with the BSNL ₹225/- plan.#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #TechUpdates #BSNLServices… pic.twitter.com/lkzKRDcdB2 — BSNL India (@BSNLCorporate) June 18, 2026
कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 225 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांची म्हणजेच संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत. बीएसएनएलच्या या स्वस्त प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5 GB हाय स्पीड डेटा देखील मिळणार आहे. म्हणजेच संपूर्ण कालावधीत यूजर्सना एकूण 75GB डेटा ऑफर केला जाणार आहे.
नव्या रिचार्ज प्लॅनबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने लिहीले आहे की, बीएसएनएलच्या व्हॅल्यू-पॅक्ड प्रीपेड रिचार्ज प्लॅनपैकी एकासोबत कनेक्टेड रहा. बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनसोबत दररोज 2.5 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि 30 दिवसांची वैधता मिळवा.