Instagram Update: भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स... जाणून घ्या कसं कराल वापर
इंस्टाग्रामचे हेड एडम मोसेरी (@mosseri) आणि प्लॅटफॉर्मच्या @creators अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, आता यूजर्स एक कॅरोसेल पोस्ट क्रिएट करताना नवीन फीचर अॅक्सेस करू शकतात. पोस्ट करण्यासाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट केल्यानंतर, यूजर्सना कॅप्शन फील्डवर टॅप करावे लागणार आहेत. इथे सिंगल कॅप्शन किंवा मल्टिपल कॅप्शन असे दोन पर्याय दिसतील. यापैकी मल्टिपल कॅप्शन पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर यूजर्स आता पोस्टमधील प्रत्येक फोटो आणि व्हिडीओसाठी वेगवेगळे कॅप्शन्स जोडू शकणार आहेत. हे फीचर रोलआऊट होण्यास सुरुवात झाली आहे आणि भारतातील यूजर्ससाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या नव्या फीचरमुळे आता यूजर्स एकाच पोस्टमध्ये अनेक फोटो आणि व्हिडीओ जोडून प्रत्येकासाठी एक वेगळे कॅप्शन लिहू शकणार आहेत. यामुळे आता क्रिएटर्स आणि सामान्य यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आता संपूर्ण पोस्टसाठी टेक्स्टचा एक सिंगल ब्लॉक दिसण्याऐवजी, इंस्टाग्राम आता स्लाइड-स्पेसिफिक कॅप्शन सादर करू शकते. यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या ईमेजच्या हिशोबाने कॅप्शन देखील बदलणार आहे.
इंस्टाग्रामचं असं म्हणणं आहे की, हे अपडेट कॅरोसेलमध्ये पर्सनल फोटो आणि व्हिडीओसह विविध माहिती अतिशय सोप्या पद्धतीने सादर करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे क्रिएटर्सना कंटेटचे नियोजन करण्यासाठी जास्त फ्लेक्सिबिलिटी देतो, जो सीक्वेंशियल स्टोरीटेलिंग किंवा विजुअल एक्सप्लेनेशनवर आधारित आहे. हा कंटेट बदल विशेषत: अशा कंटेंट फॉर्मेट्ससाठी फायदेशीर ठरू शकतो, जे टप्प्याटप्प्याने पोस्ट शेअर करत एखाद्या गोष्टीचे वर्णन करत असतात. हे फीचर ट्यूटोरियल्स, ट्रॅवल पोस्ट्स, प्रोडक्ट शोकेस आणि दुसऱ्या कंटेटसाठी फायदेशीर मानला जातो.






