
BSNL Recharge Plan: मनोरंजन होणार आणखी स्मार्ट! नव्या प्लॅनमध्ये मिळणार Zee5 सह या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत
बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या नवीन रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. कंपनीचा हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 3 महिन्यांसाठी सोनी लिव्ह, जिओहॉटस्टार आणि झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यूजर्स दोन स्क्रीनवर या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकणार आहेत. यूजर्सना या तीन ओटीटी ॲप्सवर त्यांचे आवडते चित्रपट, वेब सिरीज आणि क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता येईल.कंपनीने लाँच केलेला हा नवीन प्लॅन एक ऐड ऑन पॅक आहे. हा प्लॅन यूजर्स त्यांच्या चालू प्लॅनसोबत खरेदी करू शकतात. कंपनीने लाँच केलेल्या नवीन 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटाचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे यूजर्स कॉलिंग आणि डेटाप्लॅनसह 499 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
“3 months. 3 OTT platforms. Unlimited entertainment. Upgrade your BSNL WiFi connection with the ₹499 OTT Add-On Pack and stream cricket, movies & web series anytime.” Plan Highlights:
Price : ₹499 OTT Add-On
For 3 months OTT Apps: JioHotstar, SonyLIV, and ZEE5
Watch on 2… pic.twitter.com/NfS1noX8os — BSNL India (@BSNLCorporate) March 20, 2026
भारत संचार निगम लिमिटेड त्यांच्या यूजर्सना 997 रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये कंपनी आतापर्यंत 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत होती. मात्र आता हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्ससाठी कंपनीने एक खास ऑफर लाँच केली आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये आता 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. कंपनीची ऑफर 31 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 997 रुपये आहे.
गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या
997 रुपयांच्या या प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि डेली 100 फ्री एसएमएसचा लाभ देखील मिळणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 300GB डेटा ऑफर केला जातो. जास्तीच्या व्हॅलिडीटीसह, यूजर्सना आता 328GB हाय-स्पीड डेटा मिळेल.