
BSNL Recharge Plan: महागड्या प्लॅन्सना रामराम! महिनाभराची व्हॅलिडिटी मिळणार केवळ इतक्या किंमतीत, फायदेही जबरदस्त
बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. ज्या यूजर्सना जास्त डेटाची गरज असते, अशा यूजर्सना लक्षात ठेऊन हा प्लॅन डिझाईन करण्यात आला आहे. यासोबतच कंपनी त्यांच्या या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील देणार आहे. यामुळे यूजर्सना कमी खर्चात जास्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळणार असल्याने हा नवा रिचार्ज प्लॅन फायदेशीर मानला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 225 रुपये आहे. याबाबत कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. कंपनी त्यांच्या नव्या प्लॅनमध्ये कमी किंमतीत आकर्षक बेनिफिट्स ऑफर करत आहे.
Nonstop calls, daily high-speed data & SMS-all in one powerful plan.#BSNLIndia #UnlimitedCalls #LimitedAvailability #connect #Validity @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/Ep2n7gQs17 — BSNL India (@BSNLCorporate) April 26, 2026
बीएसएनएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 225 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची माहिती दिली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता असते. म्हणजेच, जर तुम्ही भरपूर व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन क्लासेस किंवा सोशल मीडिया ब्राउझिंग करत असाल, तर हा बीएसएनएल प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
डेटा व्यतिरिक्त हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. ज्यामुळे यूजर्स अगदी सहज मेसेजिंगचा फायदा घेऊ शकणार आहेत. तसेच प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की यूजर्स कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशभरात त्यांना पाहिजे तितके कॉल करू शकतात.
प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची म्हणजेच संपूर्ण महिन्याची आहे. साधारणपणे, या किंमत श्रेणीत उपलब्ध असलेल्या अनेक प्लॅन्समध्ये कमी डेटा किंवा खूप कमी फीचर्स मिळतात, पण बीएसएनएल खूप चांगले फायदे देत आहे, ज्यामुळे हा प्लॅन पैशाचा पुरेपूर मोबदला देणारा वाटतो.