स्टाईल आणि साउंडचा परफेक्ट कॉम्बो! Oppo च्या नव्या इअरबड्सने यूजर्सना केलं थक्क, ओपन-ईयर डिझाईन अन् पावरफुल बॅटरीने सुसज्ज
ओप्पोने लाँच केलेल्या नव्या इअरबड्सच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, लेटेस्ट लाँच इअरबड्सची किंमत CNY 899 म्हणजेच सुमारे 12,300 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ओपन-ईयर हेडसेट हाय-ग्लॉस गोल्ड आणि स्पेस ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसची विक्री 24 एप्रिलपासून सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – Oppo)
ओप्पोने लाँच केलेल्या नव्या इअरबड्समध्ये ओपन-ईयर, ईयर-क्लिप डिझाईन देण्यात आले आहे. हे इअरबड्स अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत की, डिव्हाईस कानाच्या आतील भागाऐवजी बाहेरील भागावर फिट होते. यचा अर्थ असा आहे की, तुम्ही दिर्घकाळ या इअरबड्सचा वापर करू शकणार आहात. या इअरबड्समध्ये डुअल डायनामिक ड्राइवर सेटअप देखील देण्यात आला आहे. यामध्ये 11mm आणि 9mm चे ड्राइवर मिळणार आहेत.
कंपनीने हे इअरबड्स अशा पद्धतीने डिझाईन केले आहेत की, यूजर्सना संतुलित आवाज अनुभवता येणार आहे. हे बड्स 20Hz ते 40kHz च्या फ्रीक्वेंसी रेंजला सपोर्ट करतात आणि यामध्ये जास्त इमर्सिव्ह ऐकण्याच्या अनुभवासाठी हेडफोन-साइड डेडिकेटेड ऑडिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कॉलदरम्यान आवाजाची स्पष्टता सुधारली जावी यासाठी यामध्ये AI-बेक्ड कॉल नॉइज रिडक्शनसाठी तीन-माइक्रोफोन सिस्टिम देखील दिले आहेत.
ओप्पो एन्को क्लिप 2 मध्ये ब्लूटूथ 6.1 आणि डुअल-डिवाइस पेयरिंग सपोर्ट सारखे कनेक्टिविटी पर्याय देण्यात आले आहेत. याच्या मदतीने तुम्ही दोन कनेक्टेड डिव्हाईसमध्ये अगदी सहजपणे स्विच करू शकणार आहात. इअरबड्सची वर्किंग रेंज 10 मीटरपर्यंत असल्याचे सांगितले जाते. उत्तम दर्जाच्या वायरलेस ऑडिओ ट्रान्समिशनसाठी, हे बड्स एसबीसी, एएसी आणि एलएचडीसी सारख्या अनेक ऑडिओ कोडेक्सना देखील सपोर्ट करतात.
बड्सच्या चार्जिंग केसमध्ये 530mAh बॅटरी दिली आहे. बड्स यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करतात. बड्सला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 80 मिनिटे लागतात. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर हे इअरबड्स 9.5 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम देऊ शकतात. चार्जिंग केससह, एकूण म्युझिक प्लेबॅक टाईम 40 तासांपर्यंत पोहोचू शकतो.






