OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
टॅब्लेटच्या 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4299 युआन म्हणजेच सुमारे 58,920 रुपये आहे. टॅब्लेटच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4499 युआन म्हणजेच सुमारे 61,670 रुपये आहे. टॅब्लेटच्या 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4999 युआन म्हणजेच सुमारे 68,530 रुपये आहे. टॅब्लेटच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 5499 युआन म्हणजेच सुमारे 75,370 रुपये आहे. ओप्पो पॅड 5 प्रोची विक्री चीनमध्ये सुरु झाली आहे. भारतात कंपनी 30 एप्रिल रोजी ‘वनप्लस पॅड 4’ या नावाने लाँच करेल. (फोटो सौजन्य – OPPO)
ओप्पोने लाँच केलेल्या नव्या टॅब्लेटमध्ये 13.2-इंच 3.4K 144Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच, टॅब्लेटमध्ये 315 पीपीआय, डॉल्बी व्हिजन, 1000 निट्सपर्यंत एचबीएम ब्राइटनेस आणि 540Hz पर्यंत टच सँपलिंग रेट देखील दिला आहे. कंपनीच्या नव्या टॅब्लेटमध्ये एड्रेनो 840 जीपीयूसह 4.32Hz पर्यंत ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 3nm प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. टॅब्लेटमध्ये 256GB / 512GB यूएफएस 4.1 स्टोरेजसह 8GB / 12GB / 16GB एलपीडीडीआर5एक्स रॅम देखील देण्यात आले आहे.
३६,००० किलोमीटर उंचीवरून रशियाच्या इलेक्ट्रो-एलने टिपली पृथ्वी! अंतराळातून दिसतोय भारत हिरवागार
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, टॅब्लेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि यूएसबी टाइप-सी ऑडियो, 8 स्पीकर्स, डुअल माइक्रोफोन, हाय-रिस सर्टिफिकेशन देखील देण्यात आले आहे. ओप्पो पॅड 5 प्रो मध्ये 67W सुपरवूक फास्ट चार्जिंगसह 13380 mAh बॅटरी देण्यात आली आहे.






