Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे

BSNL New Plan: सरकारी कंपनीने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 599 रुपये आहे आणि या प्लॅनमध्ये यूजर्सना दमदार फायदे ऑफर केले जाणार आहेत. ज्यामुळे हा प्लॅन व्हॅल्यू फॉर मनी ठरणार आहे. जास्त इंटरनेट डेटाची गरज असणाऱ्या लोकांसाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 11:18 AM
BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे

BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलने 599 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला असून यामध्ये 70 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि डेटा संपल्यानंतर 40Kbps वेगाने इंटरनेटची सुविधा मिळते.
  • जास्त डेटा वापरणारे, गेमिंग, स्ट्रीमिंग आणि दीर्घकाळ रिचार्जची चिंता नको असलेल्या यूजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.
सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीसीएनएल त्यांच्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या नवीन रिचार्ज प्लॅनबाबत माहिती शेअर केली आहे. कंपनीच्या या नवीन प्लॅनमध्ये यूजर्सना भरपूर डेटा आणि दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 600 रुपयांहून कमी आहे.

Tech Tips: LinkedIn वर हजारो लोकांपर्यंत पोहोचायचंय? प्रोफाईलची रिच वाढवण्यासाठी फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स

कंपनीच्या या नवीन प्लॅनमध्ये दोन महिन्यांहून अधिक दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल आणि जास्त डेटाची देखील आवश्यकता असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. बीएसएनएलचा नवीन रिचार्ज प्लॅन दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि भरपूर इंटरनेट डेटा यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत आणि व्हॅलिडीटी

कंपनीच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 70 दिवसांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर दोन महिने चिंता करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. रोजची डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट बंद होणार नाही तर स्पीड 40 Kbps होणार आहे. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेट डेटाव्यतिरिक्त दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना कॉलिंग आणि एसएमएससह जास्त इंटरनेट डेटाची देखील गरज असते.

कोणत्या यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार नवा प्लॅन?

जर तुम्हाला जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला ऑनलाईन चित्रपट, वेब सिरीज किंवा युट्यूब व्हिडीओ पाहायला आवडत असेल किंवा गेमिंग करत असाल तर हा बीएसएनएल प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा यामुळे हा ऑल-इन-वन प्लॅन ठरतो.

त्रुटी शोधा अन् जिंका लाखो रुपये! OpenAI ने सुरू केला Bounty Program, सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या नवीन रिचार्ज प्लॅनची माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जे लोक फक्त फोन वापरत नाहीत, तर त्यावरच जगतात, त्यांच्यासाठी. सतत स्क्रोलिंग आणि स्ट्रीमिंगपासून ते काम, गेमिंग आणि संपर्कात राहण्यापर्यंत, तुमच्या दिवसाला अशा रिचार्जची गरज आहे जो कधीही मागे पडणार नाही.

For the ones who don’t just use their phone-they live on it. From endless scrolling and streaming to work, gaming, and staying connected, your day deserves a recharge that never falls behind. Recharge smart with #BReX https://t.co/41wNbHpQ5c#BSNLIndia #StayConnected… pic.twitter.com/05btTtPmAS — BSNL India (@BSNLCorporate) July 10, 2026

Web Title: Bsnl new recharge plan with 70 days validity and many other benefits know about price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio VS Airtel: 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् अनलिमिटेड कॉलिंग; कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी वाचा तुलना
1

Jio VS Airtel: 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् अनलिमिटेड कॉलिंग; कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी वाचा तुलना

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी
2

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

Jio Recharge Plan: Jio चा अवघ्या ५५ रुपयांचा धमाकेदार प्लॅन! मोबाईलवर पाहू शकता १००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल
3

Jio Recharge Plan: Jio चा अवघ्या ५५ रुपयांचा धमाकेदार प्लॅन! मोबाईलवर पाहू शकता १००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल

BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार ‘हे’ फायदे
4

BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.