Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले ‘हे’ दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री

BSNL Recharge Offers: मातृदिनानिमित्त सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या ग्राहकांना एक खास भेट दिली आहे. कंपनी त्यांच्या दोन महागड्या रिचार्ज प्लॅन्सवर डिस्काऊंट ऑफर करत आहे. या ऑफरबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 01:09 PM
BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले 'हे' दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले 'हे' दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री

Follow Us
Close
Follow Us:
  • BSNL ने 1499 रुपये आणि 2399 रुपयांच्या अ‍ॅन्युअल प्लॅन्सवर 5% डिस्काउंट जाहीर केला आहे.
  • या ऑफरमुळे ग्राहकांना 200 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे.
  • दोन्ही प्लॅन्समध्ये 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा फायदे मिळतात.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमीटेड म्हणजेच बीएसएनएलने त्यांच्या यूजर्ससाठी खास ऑफर सादर केली आहे. सरकारी टेलीकॉम कंपनीने 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या दोन रिचार्ज प्लॅनची किंमत कमी केली आहे. मातृदिनानिमित्त कंपनीने त्यांच्या या खास ऑफरची घोषणा केली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी आणि कमी किंमतीत वर्षभराचा रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागणार आहे.

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

अ‍ॅन्युअल प्लॅन्ससाठी ऑफर लागू

बीएसएनएलने 1499 रुपये आणि 2399 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असणऱ्या अ‍ॅन्युअल प्लॅन्ससाठी ही ऑफर लागू केली आहे. याबाबत कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती देखील दिली आहे. ज्या यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो आणि दिर्घकाळ व्हॅलिडीटी पाहिजे असेल अशा यूजर्ससाठी कंपनीची ही ऑफर फायदेशीर ठरणार आहे. कारण यूजर्सना कमी किंमतीत संपूर्ण वर्षाची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री डेटा सारखे फायदे ऑफर केले जातात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय आहे बीएसएनएल ऑफर?

बीएसएनएलने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, आईचं प्रेम नेहमीच अमर्याद असतं. या मातृदिनी, बीएसएनएलसोबत प्रत्येक कॉल, व्हिडिओ चॅट आणि प्रत्येक क्षण आणखी खास बनवा. 1499 रुपये आणि 2399 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज करा आणि आपल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात राहताना 5% बचतीचा आनंद घ्या. कारण काही नाती यापेक्षा अधिक मौल्यवान असतात.

1499 रुपये आणि 2399 रुपयांचा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 5 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना 200 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर 10 मे पासून 17 मे पर्यंत उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि सेल्फकेअर ॲपवरच ही ऑफर उपलब्ध आहे. थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून रिचार्ज केल्यास ग्राहकांना या ऑफरचा फायदा मिळणार नाही.

A mother’s love is always unlimited. This Mother’s Day, make every call, video chat, and moment even more special with BSNL. Recharge with ₹1499 & ₹2399 plans and enjoy 5% savings* while staying connected to the ones who matter most. Because some bonds deserve more than… pic.twitter.com/oRkxLRAHSH — BSNL India (@BSNLCorporate) May 10, 2026

1499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

भारत संचार निगम लिमिटेडद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या या रिचार्ज प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षाची व्हॅलिडीटी मिळते. यामध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे देखील मिळतात. याव्यतिरिक्त, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 100 फ्री एसएमएस आणि एकूण 24GB डेटाचा फायदा मिळणार आहे. यामध्ये कोणतीही लिमीट सेट करण्यात आली नाही. बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

2399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

भारत संचार निगम लिमिटेडद्वारे ऑफर केला जाणारा हा प्लॅन देखील 365 दिवसांची व्हॅलिडीटी देतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील यूजर्सना संपूर्ण भारतात फ्री नॅशनल रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना दररोज 100 फ्री एसएमएल आणि दररोज 2GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा मिळतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL ने कोणत्या रिचार्ज प्लॅन्सवर डिस्काउंट ऑफर केला आहे?

    Ans: BSNL ने 1499 रुपये आणि 2399 रुपयांच्या अ‍ॅन्युअल प्लॅन्सवर 5% डिस्काउंट ऑफर केला आहे.

  • Que: BSNL ची ऑफर किती दिवसांसाठी उपलब्ध आहे?

    Ans: ही खास ऑफर 10 मे ते 17 मे दरम्यान उपलब्ध असणार आहे.

  • Que: थर्ड पार्टी अ‍ॅपवरून रिचार्ज केल्यास डिस्काउंट मिळेल का?

    Ans: नाही, थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून रिचार्ज केल्यास या ऑफरचा फायदा मिळणार नाही.

Web Title: Bsnl offers discount on these 2 annual recharge plans users can save up to rupees 200 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?
1

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.