Flipkart Sale 2025: तुम्हाला देखील आयफोन खरेदी करायचा आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या फ्लिपकार्टचा Goat सेल सुरु आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. जर का तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर या सेलमधून तुम्ही आयफोन १६ प्लस खरेदी करू शकणार आहात. आयफोन खरेदी करताना तुम्हाला अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट देखील मिळणार आहे. तर आयफोन १६ प्लस खरेदी करत असताना तुम्हाला कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात.
कंपनीने लॉन्च केलेल्या आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९९९ रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टच्या goat सेलमध्ये हाच आयफोन १६ प्लस केवळ ७९,९९९ रुपयांना तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तसेच तुम्ही अक्सिक्स बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून आयफोन १६ प्लस खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्यावर २,२५० रुपयांचा डिस्काउंट देखील मिळणार आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून द्वैखील आयफोनची १६ प्लसची किंमत कमी करू शकणार आहेत. आज या फ्लिपकार्टच्या Goat सेलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर का तुम्हाला आयफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल या ऑफर्सचा लाभ घेऊ शकणार आहात.
Apple iPhone 16 Plus चे स्पेसिफिकेशन
iPhone 16 Plus मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलचे हे पावरफुल डिव्हाईस A18 चिपने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये सर्व अॅप्पल इंटेलिजेंस फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोन जबरदस्त आहे. यामध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर आणि यासोबतच मागील बाजूस 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या आयफोन मॉडेलमध्ये IP68 रेटिंग आहे आणि यामध्ये अॅल्युमीनियम फ्रेम देखील देण्यात आली आहे.
Flipkart ची GOAT सेल लवकरच; iPhone 16 वर महा डिस्काउंट; किंमत काय?
Lenovo चा नवीन टॅब झाला लाँच, 10,200mAh ची बॅटरी, पावरफुल प्रोसेसर……
Lenovo Yoga Tab Plus बुधवारी भारतात लाँच करण्यात आला. हा टॅबलेट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि त्यात 10,200mAh बॅटरी आहे. यात 12.7 इंचाचा 3K LTPS PureSight Pro डिस्प्ले आणि Dolby Atmos सपोर्टसह Harman Kardon-ट्यून केलेला 6-स्पीकर सिस्टम आहे. Yoga Tab Plus मध्ये Lenovo Now AI आहे आणि 20 TOPS AI परफॉर्मन्स देण्याचा दावा आहे. यात स्टेनलेस-स्टील किकस्टँड आहे आणि Lenovo Tab Pen Pro आणि कीबोर्डला सपोर्ट करतो.