Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

टेक कंपनी Clicks Technology ने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ब्लॅकबेरीच्या किबोर्ड फोनसारखी डिझाईन देण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये अनेक कमाल फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 04, 2026 | 12:02 PM
BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • Clicks Technology चा नवीन फोन लाँच
  • 41,000 रुपयांच्या किंमतीत Communicator लाँच
  • फोनमध्ये फिजिकल कीबोर्ड दिला जाणार
तुम्हाला ब्लॅकबेरीचा किबोर्ड फोन आठवतोय का? एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक घरात ब्लॅकबेरीचा किबोर्ड फोन पाहायला मिळत होता. मात्र कालांतराने लोक स्मार्टफोन्सकडे वळले. आजही अनेकांना त्यांचा ब्लॅकबेरीचा किबोर्ड फोन आठवतो. तुम्हाला देखील तो फोन आवडत होता का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Clicks Technology नावाच्या कंपनीने ब्लॅकबेरी किबोर्ड फोन सारखी डिझाईन असणारा एक स्मार्टफोन आता लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Communicator या नावाने लाँच करण्यात आला आहे.

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम

फोनची डिझाईन अगदी ब्लॅकबेरी किबोर्ड फोन सारखी आहे. हा स्मार्टफोन कासकरून अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, जे दोन फोनचा वापर करतात. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 499 डॉलर म्हणजेच सुमारे 41,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. हे असे फीचर्स आहेत, जे सध्याच्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध नसतात. चला तर मग या खास स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Clicks builds phones now. Introducing the Clicks Communicator… Reserve today at https://t.co/atGOv4UblV! pic.twitter.com/63GTpUKd5g — Clicks (@clickskeyboard) January 2, 2026

दोन स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांसाठी बेस्ट डिव्हाईस

Clicks Communicator एक सेकेंड फोनच्या स्वरुपात डिझाईन करण्यात आला आहे. म्हणजेच जे लोकं दोन फोनचा वापर करतात, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा फोन डिझाईन करण्यात आला आहे. या फोनमध्ये फेसबूक, इंस्टाग्राम किंवा गेमसारखे अ‍ॅडॅक्टिव्ह अ‍ॅप्स उपलब्ध नाहीत. याऐवजी या फोनमध्ये महत्त्वाच्या कामांसाठी अ‍ॅप्स दिले जाणार आहेत. जसे, जीमेल, टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि स्लॅक. अशा परिस्थितीत हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे, ज्यांना जास्तीचे मेसेजिंग, ईमेल किंवा डॉक्यूमेंटवर काम करावे लागते. या फोनमध्ये फिजिकल कीबोर्ड दिला जाणार आहे. ज्यामुळे टायपिंग अधिक अचूक आणि फास्ट होते. याशिवाय कीबोर्ड फिजिकल असल्याने, व्हर्च्युअल कीबोर्ड स्क्रीनवर जास्त जागा व्यापणार नाही.

सिग्नल लाइट फीचर्सने सुसज्ज

या फोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या फोनचे एक खास फीचर म्हणजे सिग्नल लाइट. हे फीचर फोनच्या बाजूला आहे आणि याच्या आजूबाजूला लाईट देण्यात आली आहे. हे फीचर यूजर्स त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकणार आहेत. या बटणाच्या लाईटमुळे, यूजर कोणाकडून संदेश किंवा सूचना कधी प्राप्त करत आहेत हे समजू शकतील. या बटणचे नाव प्रॉम्प्ट की असणार आहे आणि हे बटण प्रेस करून व्हॉईस मेसेज पाठवला जाऊ शकतो आणि यासोबतच नोट्स देखील तयार केले जाऊ शकतात.

Free Fire Max: प्लेअर्ससाठी गोल्डन चान्स! प्लॅटिनम डिव्हिनिटी आणि ग्रीन फ्लेम ड्रॅको मोफत मिळवण्याची संधी, फक्त करा हे काम

Communicator नावाच्या या फोनमध्ये अनेक जुन्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे जे उपयुक्त असूनही हटविण्यात आले होते. जसे की, या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, फिजिकल सिम ट्रे, 2TB पर्यंत माइक्रोएसडी कार्डचा सपोर्ट आणि एयरप्लेन मोडसाठी फिजिकल स्विच देण्यात आला आहे. याशिवाय फोन 4,000 mAh बॅटरी, 50MP मेन कॅमेरा 256GB स्टोरेज, अँड्रॉयड 16 ओएस आणि 5 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट्ससह लाँच करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यूजर फोनचा मागील पॅनल स्वतः बदलू शकतील. तात्काळ खरेदी करणाऱ्यांसाठी फोनची किंमत $399 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये असेल, तर नियमित यूजर्सना तो 499 डॉलरमध्ये मिळेल.

Web Title: Clicks technology launched new smartphone design is like blackberry know about the features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा
1

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर
2

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर
3

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर
4

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.