8000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा हे तगडे 5G स्मार्टफोन्स, असे आहे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
बाजारात असे अनेक 5G स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कमाल फीचर्स दिलेले असतात. शिवाय या स्मार्टफोनची किंमत देखील कमी असते. त्यामुळे हे स्मार्टफोन्स तुम्ही अगदी सहज खरेदी करू शकता. तुम्ही देखील अशाच बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Samsung ला टक्कर देणार Honor, या दिवशी लाँच करणार नवा स्मार्टफोन! असे आहेत खास फिचर्स
आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 8 हजारांहून कमी आहे, आणि हे स्मार्टफोन्स पावरफुल फीचर्सने सुसज्ज आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट ऑफर केला जात आहे. त्यामुळे इंटरनेटच्या सुपरफास्ट स्पीडचा आनंद घेता येणार आहे. यासोबतच, तुम्हाला या डिव्हाईसमध्ये मोठी स्क्रीन, उत्तम कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसर दिला जाणार आहे. चला तर मग अशा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
या यादीमधील सर्वात पहिलं नाव आहे POCO C75 5G. या स्मार्टफोनमध्ये 6.88 इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 128Hz चा रिफ्रेश रेट ऑफर केला जातो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4s gen2 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5160 mAh बॅटरी आहे, जी 18V चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर 7,699 रुपये आहे.
यादीमधील दुसरा स्मार्टफोन आहे Lava Blaze 5G. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 700 प्रोसेसरसह 6.5 इंचचा एचडी प्लस आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट ऑफर केला जात आहे. फोनच्या मागील बाजूला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन सध्या 8,715 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र एचडीएफसी बँक पिक्सेल क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 750 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते.
itel Color Pro 5G मध्ये Dimensity 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा डुअल रियल कॅमेरा देखील आहे. याशिवाय या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 18 वाट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनची किंमत अॅमेझॉनवर 8,399 रुपये आहे. मात्र एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह, तुम्हाला फोनवर 750 रुपयांची सूट मिळू शकते. तर येस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह, तुम्हाला फोनवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळेल, ज्यामुळे तुम्ही हा फोन 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.