AI फीचर्स आणि 3D कर्व्ड डिस्प्ले... लाँच झाला Vivo चा नवा तगडा Smartphone, किंंमत तुमच्या खिशाला परवडणारी
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेक कंपनी Vivo ने त्यांचा नवीन तगडा स्मार्टफोन Vivo Y400 Pro 5G हा भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय हा स्मार्टफोन Google च्या सर्कल टू सर्च फीचरला देखील सपोर्ट करतो. तसेच या नवीन फोनमध्ये AI-बेस्ड फीचर्स देखील आहेत. या स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. त्यामुळे जे लोक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!
Vivo Y400 Pro 5G हा स्मार्टफोन भारतात बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्रीस्टाइल व्हाइट, फेस्ट गोल्ड आणि नेबुला पर्पल कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोन Vivo इंडिया वेबसाइटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि 27 जूनपासून ऑफिशियल वेबसाइट, फ्लिपकार्ट, Amazon आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Vivo Y400 Pro 5G मध्ये 6.77-इंच फुल-HD+ 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे. ज्यामध्ये, 120Hz तक रिफ्रेश रेट, 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल आणि 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट सपोर्ट देखील आहे.
Vivo Y400 Pro 5G फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन Android 15-बेस्ड FuntouchOS 15 वर आधारित आहे.
Super-charge your style with the 90W FastCharge on the all-new vivo Y400 Pro, so that you are always ready to chase your dreams.
vivo Y400 Pro launching tomorrow.https://t.co/Pda19NMsM6#vivoY400Pro #vivoYseries #ItsMyStyle #DreamChaser pic.twitter.com/VwDIcgpA7V
— vivo India (@Vivo_India) June 19, 2025
फोटोग्राफीसाठी Vivo Y400 Pro 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये f/1.79 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी सेंसर आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये f/2.45 अपर्चरसह 32-मेगापिक्सेल सेंसर आहे. फ्रंट आणि रियर कॅमरे 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
Vivo Y400 Pro 5G स्मार्टफोन युजर्सना AI-बेस्ड इमेजिंग फीचर्स ऑफर करतो. ज्यामध्ये AI Photo Enhance आणि AI Erase 2.0 यांचा समावेश आहे. यामध्ये अनेक प्रोडक्टिविटी फीचर्स आहेत, जसं की AI नोट असिस्ट, AI ट्रांस्क्रिप्ट असिस्ट, AI स्क्रीन ट्रांसलेशन आणि AI सुपरलिंक यांचा समावेश आहे.
Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स
Vivo ने Y400 Pro 5G मध्ये 5,500mAh बॅटरी दिली आहे. जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल नॅनो SIM, 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, OTG आणि USB Type-C पोर्ट यांचा सामावेश आहे. हँडसेटमध्ये IP65-रेटेड डस्ट आणि वॉटर-रेसिस्टेंट बिल्ड आहे.