ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
ऑफीसमध्ये गेल्यानंतर फाईल्स आणि इतर माहिती शेअर करण्यासाठी तुम्हाला देखील WhatsApp चा वापर करावा लागतो का? अनेकजण सकाळी ऑफीसला गेल्यानंतर अगदी दिवसभर अनेकजण ऑफीसच्या लॅपटॉप आणि कंप्युटरमध्ये WhatsApp Web वर WhatsApp लॉगिन करून ठेवतात. तुम्ही देखील असंच काही करता का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऑफीसमध्ये WhatsApp Web चा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयने एक सार्वजनिक नोटिस जारी केली आहे. ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web वापरणाऱ्या लोकांसाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ऑफीस लॅपटॉप किंवा कंम्प्युटर वापरणाऱ्या लोकांनी सावध राहा. ऑफीस लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये WhatsApp Web चा वापर करू नका. (फोटो सौजन्य – Pinterest)
मंत्रालयने सांगितलं आहे की, अनेकदा कामादरम्यान WhatsApp वर फाईल्स पाठवणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठी ऑफीसला जाणारे अनेक लोकं ऑफीसच्या लॅपटॉप आणि कंप्युटरमध्ये WhatsApp Web ओपन करतात. असे करणे सोयीचे वाटू शकते, परंतु असे केल्याने तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या नियोक्त्याला किंवा आयटी टीमला उघड होऊ शकते.
सरकारी सल्ल्यानुसार, WhatsApp Web द्वारे ऑफिसचे नेटवर्क आणि सिस्टम एडमिनिस्ट्रेटर तुमच्या पर्सनल मेसेज आणि फाईल्स अॅक्सेस करू शकतात. हे अनेक प्रकारे शक्य आहे, जसे की स्क्रीन-मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, मालवेअर किंवा ब्राउझर हायजॅकिंग. या सर्वांमुळे तुमचे वैयक्तिक चॅट्स लीक होण्याची शक्यता आहे.
सरकारने दिलेली ही चेतवाणी अशावेळी आहे जेव्हा कामाच्या ठिकाणी सायबर सुरक्षेचे धोके वाढत आहेत. सरकारची Information Security Awareness (ISEA) टीमने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कंपन्या आता WhatsApp Web ला संभाव्य सुरक्षा धोके मानत आहे. हे मालवेअर फिशिंग हल्ल्यांचे प्रवेशद्वार बनू शकते आणि कॉर्पोरेट नेटवर्कमध्ये ते व्यापक आहे.
या सल्लामसलतीत असेही म्हटले आहे की केवळ ऑफिस डिव्हाइसेसच नाही तर ऑफिस वाय-फाय वापरल्यानेही कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक फोन डेटामध्ये अंशतः प्रवेश मिळू शकतो. याशिवाय, जर तुमचा ऑफीस लॅपटॉप हॅक झाला तर वैयक्तिक डेटा उल्लंघन होऊ शकते, विशेषतः असुरक्षित वाय-फाय नेटवर्कवरून.