Canva पुन्हा डाऊन! कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती, युजर्स हैराण; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस
डिझाईन आणि क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म कॅनव्हा आज मंगळवारी 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून डाऊन झाले आहे. सुमारे 2 तास कॅनव्हा डाऊन आहे, त्यामुळे युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे की, कॅनव्हामध्ये काही ग्लिच आढळल्याने युजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे. गेल्या 2 तासांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. अनेकांनी राग व्यक्त केला आहे.
गेल्या 2 तासांपासून कॅनव्हा बंद असल्याने युजर्सची अनेक कामं खोळंबली आहे. युजर्सना फोटो ए़डीट करण्यात आणि डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी युजर्सनी कंपनीकडे केली आहे. आज सकाळपासून कॅनव्हा डाऊन झाल्याने युजर्स अडचणींचा सामना करत आहे. युजर्सना त्यांचे डिझाइन सेव्ह करण्यात आणि डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय युजर्स वेबसाईटवर त्यांची काम देखील पाहू शकत नाहीत, त्यामुळे अनेकजण वैतागले आहेत.
डाउन डिटेक्टरवरील अलिकडच्या अनेक अहवालांनुसार, कॅनव्हा सर्व प्लॅटफॉर्मवर डाऊन झाले आहे. युजर्सनी तक्रार केली आहे की वेबसाइट काम करत नाही आणि डिझाईन एडीट करण्यास आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. कॅनव्हाने त्यांच्या वेबसाइटवरील या समस्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जेव्हा सर्व्हरना एकाच प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात युजर्सच्या विनंत्यांचा सामना करावा लागतो तेव्हा अशा समस्या उद्भवतात.
डाउनडिटेक्टर प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, 64 टक्के तक्रारी वेबवर चालणाऱ्या कॅनव्हाशी संबंधित आहेत आणि फक्त 9 टक्के तक्रारींना अॅपमध्ये समस्या येत आहेत. या आउटेजचा अमेरिकेतील लोकांवर जास्त परिणाम झाला आहे असे दिसते कारण या प्रदेशातील युजर्सकडून 600 हून अधिक आउटेज तक्रारी आल्या आहेत.
युजर्स डिझाइनमधील बदल पाहू किंवा डाऊनलोड देखील करू शकत नाहीत. सामान्य प्रश्न किंवा कॅनव्हा वैशिष्ट्ये कशी वापरायची याबद्दल कॅनव्हाएआय युजर्सना प्रतिसाद देत नाही. रिअलटाइम कमेंट्स कदाचित काम करत नसतील आणि नवीन कमेंट्स पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करावे लागेल. अॅप्लिकेशन नोटिफिकेशन कदाचित काम करत नसेल आणि युजर्सना नवीन नोटिफिकेशन पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करावे लागेल. डिझाइनवरील टायमर आणि फॉलो कदाचित काम करत नसतील.
युजर्सच्या प्रचंड तक्रारीनंतर कॅनव्हाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही काम करत आहोत! गोष्टी पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही शक्य तितक्या लवकर काम करत आहोत. अपडेटसाठी https://canvastatus.com पहा. धन्यवाद!
We’re on it! We’re working as quickly as we can to get things back up and running. Check https://t.co/fluLX6fxwP for updates. Thank you! pic.twitter.com/IQGVtLeAYs
— Canva (@canva) July 8, 2025