Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी... किंमत तुमच्या बजेटमध्ये
टेक कंपनी Honor चा नवीन आणि दमदार स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Honor X9c 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस पावरफुल फीचर्सने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 6,600mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच या 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये अनेक बेस्ट AI फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत देखील कमी आहे.
Honor च्या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हे डिव्हाईस 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आहे. हे डिव्हाईस कंपनीने जेड स्यान आणि टाइटेनियम ब्लॅक शेड्समध्ये लाँच केले आहे. 12 जुलैपासून या डिव्हाईची विक्री सुरु होणार आहे. ग्राहक हा नवीन दमदार स्मार्टफोन अॅमेझॉनवरून खरेदी करू शकतात. फोनवर SBI किंवा ICICI बँक कार्ड वापरल्यास 750 रुपयांपर्यंतची त्वरित सूट देखील उपलब्ध असेल. (फोटो सौजन्य – X)
स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.78-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि फ्लिकर-फ्री आणि लो ब्लू लाइट TÜV रीनलँड सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट आणि 8GB रॅमसह 256GB ऑनबोर्ड स्टोरेज उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये Android 15-बेस्ड MagicOS 9.0 देण्यात आलं आहे. याशिवाय या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI मोशन सेंसिंग, AI इरेज, AI डीपफेक डिटेक्शन, AI मैजिक पोर्टल 2.0 आणि AI मॅजिक कॅप्सूल सारख्या अॅडवांस AI फीचर्सचा सपोर्ट उपलब्ध आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या नव्या पावरफुल डिव्हाईसमध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये 1.7 अपर्चर आणि 3x लॉसलेस झूमसह 5-मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेंस आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन दोन्हीसाठी सपोर्ट करतो. सेल्फी लवर्ससाठी डिव्हाईसमध्ये 16-मेगापिक्सेलचा सेंसर आहे.
Honor च्या या दमदार स्मार्टफोनमध्ये 66W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 6,600mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G, वाय-फाय, GPS, NFC, OTG आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन आणि पावरफुल स्मार्टफोनच्या शोधात असाल तर Honor ने लाँच केलेला नवीन 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.