Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे; Meta चा युजर्सना कडक इशारा

व्हॉट्सॲप युजर्ससाठी मेटाचा धोक्याचा इशारा! बनावट ॲप्समुळे बँक खाते रिकामे होण्याचा धोका. स्वतःला सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 02, 2026 | 05:40 PM
सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे (Photo Credit- Ai)

सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:

  • सावधान!
  • बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे
  • Meta चा युजर्सना कडक इशारा
जगभरात कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरलेल्या व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) वापरकर्त्यांसाठी एक धोक्याची घंटा वाजली आहे. व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या ‘मेटा’ने (Meta) बनावट व्हॉट्सॲप ॲप्सबाबत वापरकर्त्यांना कडक इशारा दिला आहे. या बनावट ॲप्सच्या माध्यमातून हॅकर्स वापरकर्त्यांची खाजगी माहिती चोरून थेट बँक खात्यावर डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे.

नवीन ‘फ्रॉड प्रोटेक्शन टूल’ लाँच

वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी मेटाने नुकतेच एक नवीन ‘स्कॅम आणि फ्रॉड प्रोटेक्शन टूल’ (Scam & Fraud Protection Tool) रोल आऊट केले आहे. हे टूल तुमचे व्हॉट्सॲप खाते दुसऱ्या कोणत्याही नवीन डिव्हाइसमध्ये लॉग-इन होताच तत्काळ वॉर्निंग सिस्टम ॲक्टिव्हेट करते. या सुविधेची माहिती देतानाच कंपनीने बनावट व्हॉट्सॲप आवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

इटलीच्या ‘Asigint’ कंपनीचे बनावट ॲप रडारवर

मेटाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, इटलीतील ‘Asigint’ नावाच्या कंपनीने व्हॉट्सॲपची एक बनावट आवृत्ती तयार केली आहे. या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत 200 हून अधिक अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना लक्ष्य करण्यात आले आहे. सायबर गुन्हेगार ‘सोशल इंजिनीअरिंग’च्या मार्गाचा अवलंब करून लोकांना या जाळ्यात अडकवत आहेत.

अवघ्या काही मिनिटांचा खेळ! Oracle च्या ऑटोनॉमस डेटाबेसमुळे 12000 भारतीयांनी नोकऱ्या का गमावल्या?

बनावट व्हॉट्सॲपमुळे होणारे धोके:

  • रिमोट ॲक्सेस: या ॲपद्वारे हॅकर्स तुमच्या फोनचा रिमोट ॲक्सेस मिळवू शकतात.
  • बँकिंग फ्रॉड: फोनचा ताबा मिळाल्यावर तुमच्या फोनमधील बँकिंग ॲप्स आणि ओटीपी (OTP) चोरले जाऊ शकतात.
  • खाजगी चॅट्स: तुमचे खाजगी संवाद आणि फोटो हॅकर्सच्या हाती लागण्याची भीती आहे.

व्हॉट्सॲप कोठून डाऊनलोड करावे?

मेटाने स्पष्ट केले आहे की, त्यांचे अधिकृत व्हॉट्सॲप पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणतीही त्रुटी नाही. मात्र, सुरक्षिततेसाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे:

1. अधिकृत स्टोअर: व्हॉट्सॲप नेहमी Google Play Store (अँड्रॉइडसाठी) किंवा Apple App Store (आयफोनसाठी) वरूनच डाऊनलोड करा.

2. प्ले प्रोटेक्ट: अँड्रॉइड युजर्सनी आपल्या फोनमध्ये ‘Play Protect’ फिचर नेहमी इनेबल ठेवावे.

3. थर्ड पार्टी स्टोअर्स टाळा: युरोपियन युनियनमधील नियमांमुळे ॲपलने थर्ड पार्टी मार्केटप्लेसची परवानगी दिली असली, तरी अनोळखी प्लॅटफॉर्मवरून ॲप्स घेणे टाळावे.

संशयास्पद लिंक्सपासून सावध राहा

अनेकदा व्हॉट्सॲप अपडेट करण्याच्या नावाखाली किंवा ‘पिंक व्हॉट्सॲप’, ‘व्हॉट्सॲप गोल्ड’ अशा नावांनी लिंक्स पाठवल्या जातात. अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. यामध्ये धोकादायक ‘मालवेअर’ किंवा ‘व्हायरस’ असू शकतात, जे तुमच्या फोनमधील डेटा चोरण्याचे काम करतात.

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर

Web Title: Caution fake whatsapp could empty your bank account meta issues stern warning to users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • meta
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.