आता तुम्हीही विसराल Ghibli चा ट्रेंड! ChatGPT बनवू शकतो 10 प्रकारच्या स्टायलिश ईमेज, Instagram रिल्स व्हायरल
गेल्या आठवड्यात, OpenAI च्या ChatGPT ने Ghibli ईमेज तयार करण्यासाठी 4o इमेज जनरेशन फीचर लाँच केले. बघता बघता सोशल मीडिया युजर्सना या फीचरचा वेड लागलं. सर्वजण Ghibli ईमेज तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, चॅटजीपीटी केवळ Ghibli ईमेजच तयार करत नाही, तर इतर 10 प्रकारच्या ईमेज देखील तयार करू शकतो. या इतर ईमेज देखील Ghibli ईमेजप्रमाणेच मजेदार आहेत.
ChatGPT गद्दार आहेस तू… Ghibli स्टाईल फोटो न मिळाल्याने युजर नाराज! Instagram रिल्स व्हायरल
जर तुम्हाला भविष्यातील हाय-टेक दुनिया आणि नियॉन लाइट्सने चमकणाऱ्या शहरांचा लुक आवडत असेल तर ही ईमेज स्टाईल तुमच्यासाठी आहे. यामध्ये एक डार्क, ग्रिट्टी आणि फ्यूचरिस्टिक वाइब आहे, ज्यामुळे ही ईमेज स्टाईल कूल वाटते. (फोटो सौजन्य – Pinterest)
यूरोपमधील चित्रकारांपासून प्रेरित अशी ही स्टाईल ड्रॅमेटिक लाइटिंग, समृद्ध टेक्सचर्स आणि बारीक डिटेल्स टीपते. जर तुम्हाला जुन्या काळातील क्लासिक पेटिंगचा लूक पाहिजे असेल तर ही स्टाईल बेस्ट आहे.
जर तुम्हाला रेट्रो गेमिंग आवडते, तर पिक्सल आर्ट तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन असू शकते. ही स्टाइल तुमच्या इमेजला छोट्या -छोट्या पिक्सल्समध्ये कन्वर्ट करते आणि विंटेज आणि मॉडर्न असे दोन्ही लूक देते.
जर तुम्हाला टॉय स्टोरी किंवा इनसाइड आउट सारख्या पिक्सार चित्रपटातील पात्रांसारख्या गुबगुबीत आणि मैत्रीपूर्ण दिसणाऱ्या इमेजे तयार करायच्या असतील तर ही स्टाइल बेस्ट आहे. हे एक सॉफ्ट आणि क्यूट फीलिंग देते, ज्यामुळे तुमची ईमेज अधिक आकर्षक दिसते.
जर तुम्हाला कार्टून आवडत असतील तर ही स्टाइल नक्कीच वापरून पहा. यामध्ये 2D क्लासिक लुक (Looney Tunes) पासून आधुनिक कार्टून स्टाइल (Adventure Time) पर्यंत भरपूर विविधता उपलब्ध आहे.
जर तुम्हाला गडद आणि रहस्यमय देखावा हवा असेल तर गॉथिक नॉयर स्टाइल सर्वोत्तम असेल. यात खोल सावल्या, कमी प्रकाश आणि नाट्यमय स्पर्श आहे, ज्यामुळे ते परफेक्ट डार्क फँटेसी लुक देते.
Ghibli स्टाईल इमेजनंतर आता Videos ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ! असा करू शकता वापर
जर तुम्हाला मजेदार आणि व्यंगचित्र स्टाइलमध्ये इमेज तयार करायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, चेहऱ्यावरील काही वैशिष्ट्ये अतिशयोक्तीपूर्ण आहेत आणि ठळक रेषा आणि उच्च कॉन्ट्रास्ट वापरला जातो.
जर तुम्हाला अद्वितीय आणि अवास्तव स्वप्नासारखी प्रतिमा तयार करायची असेल तर ही स्टाइल परफेक्ट आहे. हे प्रसिद्ध कलाकार Salvador Dalí आणि René Magritte यांच्या कलेतून प्रेरित आहे.
तुम्हाला जपानी आर्ट स्टाइल आवडत असल्यास, तुम्ही मंगा आणि ॲनिम स्टाइल वापरून पाहू शकता. हे तुम्हाला डायनॅमिक आणि अर्थपूर्ण कॅरेक्टर डिझाइनसह क्लासिक मंगा पॅनेल किंवा चमकदार ॲनिम पोट्रेट तयार करू देते.
जर तुम्हाला मोनेट आणि रेनोइर सारख्या कलेची झलक एखाद्या प्रतिमेमध्ये हवी असेल, तर इंप्रेशनिस्ट ब्रशवर्क शैली सर्वोत्तम असेल. हे सैल, अर्थपूर्ण ब्रश स्ट्रोक वापरते, जे पेंटिंगला उत्कृष्ट कलात्मक अनुभूती देते.