Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

ChatGPT New Feature: चॅटजीपीटीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरमध्ये यूजर्स ऑनलाईन कपडे खरेदी करण्यापूर्वी ट्रायल करू शकणार आहेत. यामुळे ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2026 | 10:39 AM
ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं 'ट्राय ऑन' फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं 'ट्राय ऑन' फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • चॅटजीपीटीने सादर केले नवीन वर्चुअल ट्राय-ऑन फीचर
  • ट्राय ऑन फीचर अलीकडेच जारी करण्यात आलेल्या चॅटजीपीटी ईमेज 2.5 मॉडेलचा वापर करते
  • ईमेज तयार करण्याचा वेग यूजरच्या इंटरनेट स्पीडवर अवलंबून असणार
ChatGPT: ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्या मनात एक प्रश्न नेहमीच असतो की आपण खरेदी करत असलेले कपडे आपल्याला चांगले दिसतील की नाही. आपल्या मनात असलेल्या याच प्रश्नामुळे आपण ऑनलाईन शॉपिंग करणं टाळतो. पण आता असं करण्याची गरज नाही. कारण ओपनएआयचे एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीने एक नवीन वर्चुअल ट्राय-ऑन फीचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने ऑनलाईन शॉपिंग अधिक विजुअल बनवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

चॅटजीपीटी घेऊन येतोय नवं फीचर

चॅटजीपीटीचे नवीन फीचर यूजर्सना कपडे खरेदी करण्यापूर्वी त्यांचा सेल्फी किंवा फुल-बॉडी फोटो अपलोड करून ते खरेदी करणार असलेले कपडे किंवा ॲक्सेसरीज त्यांच्यावर कशा दिसतील, हे दाखवणार आहे. हे फीचर शॉपिंग रिझल्ट्समध्ये एक नवीन ट्राय ऑन बटनद्वारे पाहायला मिळत आहे. यूजर्स कंपड्यांचे स्क्रीनशॉट किंवा फोटो अपलोड करू शकतात आणि चॅटजीपीटीला त्याचे प्रिव्ह्यू तयार करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. हे अपडेट एका नव्या फेवरेट ऑप्शनसह उपलब्ध असणार आहे, जे ग्राहकांना त्यांच्या लायब्रेरीमध्ये प्रोडक्ट्स सेव्ह करण्याची परवानगी देणार आहे. ओपनएआयचे असं म्हणणं आहे की, दोन्ही फीचर लवकरच जगभरात रोलआऊट केले जात आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

ट्राय ऑन फीचर कसं करणार काम?

चॅटजीपीटीने अलीकडेच ट्राय ऑन नावाने एक नवीन फीचर सादर केले आहे. हे फीचर यूजर्सना ऑनलाइन कपड्यांची खरेदी करताना विजुअल एक्सपीरियंस अधिक चांगला करण्यास मदत करू शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन ट्राय ऑन फीचर अलीकडेच जारी करण्यात आलेल्या चॅटजीपीटी ईमेज 2.5 मॉडेलचा वापर करते. याव्यतिरिक्त, कंपनीने स्पष्ट केले आहे की, हे मॉडेल सूचना जास्त अचूकतेने फॉलो करते आणि वेगाने ईमेज जनरेट करताना जास्त नैसर्गिक लाइटिंग आणि चांगले टेक्सचर तयार करू शकते.

चॅटजीपीटी ट्राय ऑन फीचरचा वापर कसा केला जाऊ शकतो?

जर तुम्हाला चॅटजीपीटीच्या ट्राय ऑन फीचरचा वापर करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला चॅटजीपीटी प्लॅटफॉर्म ओपन करावा लागेल आणि चॅटजीपीटी शॉपिंग रिझल्ट्समध्ये दाखवले जाणारे कपड्याचे प्रोडक्ट ओपन करा. आता ट्राय ऑन बटनवर टॅप करा. यानंतर तुम्हाला रेफरेंससाठी एक सेल्फी किंवा फुल-बॉडी फोटो अपलोड करावी लागणार आहे. आता चॅटजीपीटी तुम्ही तो पोशाख परिधान केलेला असतानाचा एक ‘प्रिव्ह्यू’ तयार करेल. ईमेज तयार करण्याचा वेग यूजरच्या इंटरनेट स्पीडवर अवलंबून असणार आहे.

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

चॅटजीपीटीने सादर केले फेव्हरेट सेक्शन

ट्राय ऑन फीचरव्यतिरिक्त कंपनीने एक फेव्हरेट सेक्शन देखील सादर केले आहे. जे यूजर्सना प्रोडक्ट्स त्यांच्या लायब्रेरीमध्ये सेव्ह करण्याची सुविधा देतात. यामुळे सेव्ह केलेले प्रोडक्ट्स पुन्हा पाहिले जाऊ शकतात आणि जनरेट केलेले ट्राय-ऑन ईमेज देखील पाहू शकता. चॅटजीपीटी यूजर्सना स्टाईल डिस्क्रिप्शनच्या आधारे पूर्ण आऊटफीट तयार करण्याची किंवा सेलिब्रिटी आऊटफिट फोटोंवरून कपडे ओळखण्यासही मदत करू शकते.

Web Title: Chatgpt introduced new try on feature and favorite section know how it will work hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
1

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
2

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
3

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
4

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.