
UMANG App (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
UMANG म्हणजे सरकारच्या सगळ्या सेवा एका जागी मिळणारे App आहे. यातच ESIC ची सेवा पण दिली आहे. ही माहिती बऱ्याच लोकांना माहितच नाही.सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये Play Store वरून UMANG App डाऊनलोड करून घ्या. त्यात मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. हे एकदाच करायचे आहे.
App ओपन केल्यानंतर वरती सर्च बारमध्ये ESIC असे टाईप करा. तिथे तुम्हाला Employee Centric Services नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आत गेल्यावर View Contribution हा पर्याय निवडा.आता तुमचा 10 अंकी ESI नंबर म्हणजेच IP Number टाका. हा नंबर तुमच्या सॅलरी स्लिपवर किंवा कंपनीने दिलेल्या ESI कार्डवर असतो. नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाकून सबमिट करा.झाले. तुमच्या समोर तुमचा पूर्ण ESI चा इतिहास उघडेल.
Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
तुम्ही वर्ष आणि कालावधी निवडला की कंपनीने तुमच्यासाठी किती दिवस काम दाखवले, तुमचा पगार किती दाखवला आणि दर महिन्याला किती पैसे भरले याची पावती दिसेल. कोणत्या चलान नंबरने पैसे भरले हे पण दिसेल. तुम्हाला हवे असेल तर ही फाईल PDF मध्ये डाऊनलोड पण करता येते. कंपनीने पैसे कापून न भरल्यास ते लगेच समजेल. अनेक ठिकाणी हाच घोळ होतो.
UMANG App शिवाय तुम्ही ESIC च्या अधिकृत IP Portal वरून पण ही माहिती घेऊ शकता. तिथे लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमचे e-Pehchan Card आणि Health Passbook डाऊनलोड करता येते. याचा फायदा काय? तर दवाखान्यात जाताना खरे कार्ड सोबत नेण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये असलेले डिजिटल कार्ड दाखवले तरी कॅशलेस उपचार मिळतात. खूप लोकांना हे माहित नसते आणि ते कार्डसाठी धावपळ करतात.
नियम असा आहे की ज्यांचा महिन्याचा पगार 21,000 रुपयांच्या आत आहे त्यांना ESI लागू होते. यात तुमच्या पगारातून फक्त 0.75% कापले जाते आणि कंपनीकडून 3.25% भरले जाते. मिळून एकूण 4% सरकारकडे जाते.या 4% मध्ये तुम्हाला पूर्ण कुटुंबासाठी दवाखान्याची सुविधा, औषधे, आणि गरज पडली तर पगार पण मिळतो. त्यामुळे हे छोटे पैसे नाहीत, तुमच्या हक्काचे पैसे आहेत.जर तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल तर आजच एकदा तुमची स्लिप काढा, त्यावरचा IP नंबर घ्या आणि UMANG App वर जाऊन चेक करा. दोन मिनिट लागतील पण तुमचे पैसे सुरक्षित आहेत की नाही हे कळेल. फसवणूक होण्यापासून वाचायचे असेल तर ही सवय दर दोन-तीन महिन्याला एकदा चेक करण्याची लावून घ्या.
Ans: ESIC शोधून Employee Centric Services मधील View Contribution पर्याय निवडा.
Ans: 10 अंकी IP नंबर आणि मोबाईलवर आलेला OTP आवश्यक आहे.
Ans: ESIC IP Portal वरून e-Pehchan Card डाउनलोड करता येते.