Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम हळूहळू संपूर्ण जगावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या युद्धाचा परिणाम जगभरातील इंटरनेटवर सेवेवर देखील होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2026 | 11:12 AM
गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण युद्धाचा मोठा परिणाम? भारतासह जगभरातील इंटरनेटवर संकटाची शक्यता
  • युद्धामुळे इंटरनेट बंद होऊ शकते? समुद्राखालच्या केबल्सवर वाढला धोका
  • अमेरिका-इराण संघर्ष तीव्र; जगभरातील इंटरनेट सेवांवर निर्माण झाला धोका
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाने आता तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केला आहे. याचा परिणाम तेल आणि गॅस सिलेंडरवर आधीच होत आहे. मात्र आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की दोन देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम इंटरनेटवर देखील होऊ शकतो. समुद्राच्या तळाशी काही आशा केबल्स आहेत ज्याच्या मदतीने केवळ मध्यपूर्वेतच नाही तर संपूर्ण जगभरात इंटरनेटचा पुरवठा केला जातो. या केबल्सवर जर परिणाम झाला तर संपूर्ण जगभरातील इंटरनेट बंद होऊ शकतो.

केवळ 5 सेकंदात मिळणार मदत! Facebook आणि Instagram रोलआऊट झाले मेटाचे खास ‘AI असिस्टंट’, कसं करणार काम?

गेल्या आठवड्यात मेटा कंपनीने ब्लूमबर्गला सांगितले की, त्यांनी त्यांच्या 2Africa प्रकल्पाचा एक भाग थांबवला आहे. आफ्रिका आणि आखाती प्रदेशांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आखलेली 45,000 किलोमीटर लांबीची एक केबल प्रणाली पाण्याखाली होती. मात्र हा प्रकल्प स्थगित करण्यात आल्याने केबलच्या एका भागावर परिणाम झाला आहे. हा भाग ओमान, संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरीन, कुवेत, इराक, पाकिस्तान, भारत आणि सौदी अरेबियामधील लँडिंग स्टेशनमधून जातो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

केबल टाकण्याची जबाबदारी असलेल्या फ्रान्सच्या सहकारी मालकी कंपनी अल्काटेल सबमरीन नेटवर्कने त्यांच्या ग्राहकांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीने असेही कळवले आहे की, त्यांचे इन्स्टॉलेशन जहाज, ‘इले दे बात्झ’, सौदी अरेबियातील दम्मामच्या किनाऱ्याजवळ अडकले आहे.

असं सांगितले जाते की, तांबडा समुद्र आणि पर्शियन आखातीखाली समुद्रतळावर टाकलेल्या शेकडो फायबर ऑप्टिक्स केबलमधून जगातील 95% पेक्षा जास्त इंटरनेट ट्रॅफिक वाहून नेले जाते. म्हणजेच तुमचा ईमेल, व्हिडिओ कॉल, क्लाऊड सेवा, आर्थिक व्यवहार, व्हिडिओज स्ट्रिमिंग यांसारखी सर्व डिजिटल कामे केबल्सवर अवलंबून असतात. या केबल्स ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्यांनी आखाती प्रदेशात उभारलेल्या विशाल डेटा सेंटर्सना जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांशी जोडतात. त्यामुळे जर युद्धामुळे या केबल्सवर कोणताही परिणाम झाला तर संपूर्ण जगावर याचा परिणाम होऊ शकतो. भारतासह इतर अनेक देशातील इंटरनेट विस्कळीत होऊ शकते.

Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा

गेल्या वर्षी तांबड्या समुद्रात केबल तुटल्यामुळे भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. याचा परिणाम नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झाला होता. पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title: Could the united states iran conflict disrupt global internet undersea cables raise concern tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Iran Vs America
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.