Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा
अशी माहिती समोर आली आहे की, अमेझॉन एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन कंपनी ट्रान्सफॉर्मर नावाच्या एका प्रकल्पांतर्गत डिझाईन करत आहे. हा एक पर्सनलाइड डिव्हाईस असू शकतो जो अलेक्सासोबत सिंक असणार आहे. व्हॉईस असिस्टंट अलेक्सा संपूर्ण दिवस अमेझॉन आणि युजर्स यांच्यामध्ये सतत संपर्काचे माध्यम म्हणून काम करेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मर प्रोजेक्ट, जेफ बेझोस यांच्या दीर्घकाळापासूनच्या दूरदृष्टीचा एक भाग आहे. या दूरदृष्टीमध्ये ‘स्टार ट्रेक’ या विज्ञान-कथा मालिकेत दाखवलेल्या आवाजाने नियंत्रित होणाऱ्या संगणकांप्रमाणे एक “सर्वव्यापी, आवाजाने चालणारा संगणकीय सहाय्यक” तयार करण्याचा प्रयत्न होता. मिळालेल्या माहितीनुसार, बेझोस यांनी प्रामुख्याने खरेदीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका स्मार्टफोनची कल्पना केली होती. एक असा स्मार्टफोन जो जलद शिपिंग आणि ॲमेझॉन प्राइम सदस्यत्वाद्वारे सवलती देऊन टेक कंपनी ॲपलशी स्पर्धा करू शकेल.
ट्रान्सफॉर्मर प्रोजेक्टची किंमत, लाँच टाईमलाईनबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र रिपोर्टमध्ये असं सांगितलं जात आहे की, जर कंपनीने त्यांची रणनिती बदलली किंवा काही आर्थिक अडचणी आल्या तर हा प्रोजेक्ट तात्काळ बंद केला जाऊ शकतो. असं सांगितलं जात आहे की, अॅमेझॉनच्या ट्रान्सफॉर्मर प्रकल्पाचे नेतृत्व ॲमेझॉनच्या डिव्हाइसेस विभागातील झीरोवन (ZeroOne) नावाचा एक नवीन गट करत आहे. या गटाची कमान मायक्रोसॉफ्टचे फॉर्मर एग्जीक्यूटिव जे. अलार्ड यांच्या हाती आहे. जे. अलार्ड यांनी यापूर्वी झून आणि एक्सबॉक्स सारख्या प्रोडक्ट्सवर काम केले होते. असं सांगितलं जात आहे की, केवळ बेसिक फीचर्स असलेला लाईट फोन अॅमेझॉनसाठी आदर्श ठरणार आहे.
अॅमेझॉनचा हा कथित स्मार्टफोन पर्सनलाइजेशनवर अधिक जोर देणार आहे. याद्वारे यूजर्स अॅमेझॉनवर अगदी सहज शॉपिंग करू शकणार आहेत आणि प्राईम व्हिडीओवर कंटेंट स्ट्रीम करू शकणार आहेत. यासोबतच, यूजर्स प्राईम म्युझिक देखील तात्काळ एक्सेस करू शकणार आहेत आणि ग्रबहबद्वारे जेवण ऑर्डर करता येईल. या प्रोजेक्टमध्ये अनेक एडवांस्ड AI फीचर्स इंटीग्रेट केले जाऊ शकतात. ज्यामुळे ॲप्स डाउनलोड आणि नोंदणी करणे आवश्यक असलेल्या ट्रेडिशनल ॲप स्टोअर्सची गरज नाहीशी होईल. अशी आशा आहे की, डिव्हाईसमध्ये व्हॉईस असिस्टेंट Alexa एक महत्त्वाची भुमिका निभावणार आहे. ॲमेझॉन फायर फोन जून 2014 मध्ये 649 डॉलर म्हणजेच सुमारे 60,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र या स्मार्टफोनची मागणी नसल्यामुळे ॲमेझॉनने सप्टेंबर 2015 मध्ये या मॉडेलची विक्री बंद केली.






