Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नकोसं झालंय नवं तंत्रज्ञान! तरूणांमध्ये कमी होतेय AI ची क्रेझ? विश्वासही झाला कमी? या कारणामुळे भडकले यूजर्स

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) बद्दल तरुणांमध्ये एकेकाळी प्रचंड आकर्षण होतं, पण आता त्याचं चित्र बदलताना दिसत आहे. नवीन रिपोर्टनुसार Gen Z मध्ये एआयबाबतचा विश्वास कमी होत असून, उत्साहाऐवजी नाराजी वाढत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2026 | 10:34 AM
नकोसं झालंय नवं तंत्रज्ञान! तरूणांमध्ये कमी होतेय AI ची क्रेझ? विश्वासही झाला कमी? या कारणामुळे भडकले यूजर्स

नकोसं झालंय नवं तंत्रज्ञान! तरूणांमध्ये कमी होतेय AI ची क्रेझ? विश्वासही झाला कमी? या कारणामुळे भडकले यूजर्स

Follow Us
Follow Us:
  • Gen Z मध्ये एआयबाबतचा विश्वास कमी होत असून, उत्साहाची जागा हळूहळू नाराजी घेत आहे.
  • डिपफेक, फसवणूक आणि चुकीच्या वापरामुळे एआयबद्दल भीती आणि अविश्वास वाढत आहे.
  • भविष्यात नोकऱ्यांवर परिणाम होण्याच्या भीतीमुळे तरुणांमध्ये एआयविरोधी भावना वाढताना दिसत आहेत.
आर्टिफिशिअल इंटेलिजेंस म्हणजेच एआय भविष्याला नवीन स्वरुप देण्यासाठी तयारी करत आहे. एआयमुळे भविष्यात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या तरूणांमध्ये एआयची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या – छोट्या कामांसाठी वापरले जाणारे एआय तरूणांना भूरळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नुकतेच काही रिपोर्ट समोर आले आहेत, यामुळे आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. असं सांगितलं जात आहे की, Gen Z यूजर्सचा आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरून विश्वास कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे एकेकाळी वाढत असलेली एआयची क्रेझ आता कमी होत आहे.

Google ची मोठी घोषणा! Gemini AI अ‍ॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

एआयमुळे होत असलेला बदल अनेकांना मान्य नाही. तर अनेकांनी या तंत्रज्ञानाबाबत चिंता देखील व्यक्त केली आहे. यामागे अनेक कारण आहेत. सर्वात पहिले कारण म्हणजे एआयचा वापर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पद्धतींनी केला जात आहे. याची अनेक उदाहरण समोर आली आहे. डिपफेकपासून अगदी लोकांची फसवणूक करण्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतींनी एआय वापरला जातो. दुसरे कारण म्हणजे एआय सर्व कामं करू शकतात असा दावा नेहमीच केला जातो. म्हणजेच अगदी आर्टिकल लिहीण्यापासून गणितं सोडवण्यापर्यंत, एआय शिक्षकांपासून हॉटेलमधील मॅनेजरपर्यंत एआय सर्वकाही करू शकतो. यामुळेच भविष्यात नोकरीच्या संधी कमी होऊ शकतात आणि तरूणांच्या करीअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. याच कारणामुळे तरूणांमधील एआयची क्रेझ कमी होत असल्याचा दावा केला जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ एआयद्वारे तयार केले जातात तर काही व्हिडीओ ओरिजीनल असतात. मात्र एआयच्या वाढत्या प्रभावामुळे एआय व्हिडीओ आणि ओरिजीनल व्हिडीओ यांंच्यामधील फरक ओळखणं अतिशय कठीण झालं आहे. याचा राग अनेकांनी व्यक्त केला आहे. अनेकदा क्रिएटर्स बरीच मेहनत करून एखादा व्हिडीओ तयार करतात. मात्र जेव्हा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होतो, तो एआय व्हिडीओ असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो. यामुळे तरूणांमध्ये एआयबाबतचा द्वेष वाढत आहे. एकेकाळी तरूणांमध्ये एआयची क्रेझ मोठ्या प्रमाणात होती. एआयमुळे आपली कामं सोपी होत असल्याने अनेकांनी आनंद देखील व्यक्त केला होता. मात्र याचा गांभीर्याने विचार केल्यास खरी परिस्थिती लक्षात येते, ज्यामुळे तरूणांमधील AI ची क्रेझ आणि विश्वास कमी होत आहे.

आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

गॅलप, जीएसव्ही व्हेंचर्स आणि वॉल्टन फॅमिली फाउंडेशन यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात जनरेटिव्ह एआयबद्दल Gen Z चा दृष्टिकोन कसा आहे, याचा अभ्यास करण्यात आला आहे. सुमारे 48 टक्के यूजर्सचं असं म्हणण आहे की, कामाच्या ठिकाणी एआयचे फायदे कमी आणि नुकसान जास्त आहे. सुमारे 14 टक्के यूजर्समध्ये एआयबाबतचा उत्साह कमी झाला आहे. त्यांचा हा उत्साह रागात बदलला आहे. यामुळे तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Craze of ai technology is reducing in gen z trust is also decreasing this is the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.