Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GTA 6 लाँचपूर्वीच Rockstar Games वर सायबर अटॅक! डेटा लीक करण्याची दिली धमकी; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

अगदी काही दिवसांत GTA 6 लाँच केले जाणार आहे. मात्र यापूर्वीच एक मोठी घटना घडली आहे. रॉकस्टार गेम्स पुन्हा एकदा सायबर अटॅकचे शिकार झाले आहे. यापूर्वी कंपनीला धमकी देखील देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2026 | 09:21 AM
GTA 6 लाँचपूर्वीच Rockstar Games वर सायबर अटॅक! डेटा लीक करण्याची दिली धमकी; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

GTA 6 लाँचपूर्वीच Rockstar Games वर सायबर अटॅक! डेटा लीक करण्याची दिली धमकी; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • रॉकस्टार गेम्स पुन्हा एकदा सायबर अटॅकचा बळी ठरले असून ‘ShinyHunters’ हॅकर ग्रुपने थर्ड पार्टी सिस्टमद्वारे डेटा ऍक्सेस केल्याचा दावा केला आहे.
  • हॅकर्सनी कंपनीला धमकी देत सांगितले आहे की, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास चोरी केलेला डेटा सार्वजनिक केला जाईल.
  • रॉकस्टार गेम्सने या घटनेचा यूजर्सवर मोठा परिणाम होणार नसल्याचे सांगितले असले तरी सायबर तज्ज्ञांनी याला गंभीर सुरक्षा इशारा मानले आहे.
जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय गेम सीरीज ग्रँड थेफ्ट ऑटो (GTA 6) चे डेवलपर Rockstar Games, वर पुन्हा एकदा सायबर अटॅक झाला आहे. रॉकस्टार गेम्स पुन्हा एकदा डेटा ब्रीच (डेटा चोरी) चे शिकार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका हॅकर ग्रुपने कंपनीच्या काही डेटामध्ये अनधिकृत प्रवेश केला आहे. तसेच सायबर गुन्हेगारांनी रॉकस्टार गेम्सला धमकी दिली आहे की, जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कंपनीचा डेटा सार्वजनिक केला जाईल. GTA 6 लाँचिंगमुळे ही कंपनी गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे आणि अशाचवेळी सायबर अटॅकची घटना समोर आली आहे.

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा

रॉकस्टार गेम्स काय म्हणाले?

रॉकस्टार गेम्सने या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या सिस्टिमवर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही. हे केवळ मर्यादित माहितीशी संबंधित प्रकरण आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

सायबर गुन्हेगारांना कसे मिळाले यश?

रिपोर्ट्सनुसार, ‘ShinyHunters’ नावाच्या एका हॅकर्स ग्रुपने दावा केला आहे की, त्यांनी एक थर्ड पार्टी एनालिटिक्स कंपनी ‘Anodot’ द्वारे रॉकस्टार गेम्सच्या डेटा एक्सेस मिळवला आहे. या डेटाचा वापर रॉकस्टार गेम्सद्नारे क्लाउड कॉस्ट आणि डेटा मॉनिटरिंगसाठी केला जात होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॅकर्सच्या ग्रुपने यावेळी रॉकस्टारच्या मुख्य सर्वरवर थेट निशाणा साधला नाही, तर यावेळी थर्ड पार्टी सिस्टमद्वारे हा डेटा एक्सेस करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर हॅकर्स ग्रुपने धमकी दिली आहे की, जर कंपनीने हॅकर्सच्या मागण्या मान्य करत मर्यादित वेळेपर्यंत पैसे दिले नाहीत तर चोरी करण्यात आलेला सर्व डेटा सार्वजनिक स्वरुपात लिक केला जाईल. जर खरंच असे झाले तर कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं.

हॅकर्स ग्रुपने दिली धमकी?

हॅकर्सच्या ग्रुपने रॉकस्टार गेम्सला एक डेडलाइन देखील दिली होती. जर या वेळेपर्यंत रॉकस्टार गेम्सने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर संपूर्ण डेटा सार्वजनिक स्वरुपात लीक केला जाईल. तसेच हॅकर्सच्या ग्रुपने असं देखील सांगितलं आहे की, जर कंपनीने त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर कंपनीसाठी डिजिटल समस्यां’सारख्या अधिक समस्या निर्माण केल्या जाऊ शकतात. तर या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देतान रॉकस्टार गेम्सने सांगितलं आहे की, जो डेटा एक्सेस झाला आहे, त्यामध्ये कंपनीची अनावश्यक माहिती आहे आणि याचा यूजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही आणि कंपनीच्या कामकाजावर देखील कोणताही मोठा परिणाम होणार नाही. मात्र, सायबर तज्ज्ञ या घटनेकडे एक गंभीर सायबर सुरक्षा इशारा म्हणून पाहत आहेत.

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच

रॉकस्टार गेम्सवर यापूर्वी देखील सायबर अटॅक झाले आहेत. 2022 मध्ये कंपनीच्या अंतर्गत सिस्टीममधून GTA 6 चे अनेक गेमप्ले फुटेज आणि कोड लीक लीक करण्यात आले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. तसेच, डिसेंबर 2023 मध्ये GTA 6 चा पहिला ऑफिशियल ट्रेलर देखील वेळेपूर्वीच लीक झाला होता. ज्यामुळे रॉकस्टार गेम्सला देखील ट्रेलर वेळेपूर्वीच रिलीज करावा लागला. 19 नोव्हेंबर 2026 रोजी GTA 6 रिलीज केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. हा गेम PS5 आणि Xbox Series S/X वर लाँच केला जाईल. या सततच्या सायबर हल्ल्यांमुळे गेमिंग उद्योगातील डेटा सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Web Title: Cyber attack on rockstar games before gta 6 launching know in detail tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Cyber Attack
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

SBI चा ग्राहकांना Alert! तुमचा Bank Balance होऊ शकतो झिरो; YONO App वापरत असाल तर वेळीच सावध व्हा
1

SBI चा ग्राहकांना Alert! तुमचा Bank Balance होऊ शकतो झिरो; YONO App वापरत असाल तर वेळीच सावध व्हा

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच
2

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला
3

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर
4

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.