Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

३० सप्टेंबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. ठाण्यात शिवसेना नेत्यावर गोळीबार, आशियाई खेळात भारतीय तिरंदाजी संघाची सुवर्ण कामगिरी, MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आणि कोकणासह मुंबईला पावसाचा इशारा; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 30, 2026 | 10:15 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 30. 09.2026

Maharashtra Breaking News Today 30. 09.2026

Follow Us
Follow Us:
  • 30 Sep 2026 10:15 AM (IST)

    30 Sep 2026 10:15 AM (IST)

    Maharashtra Monsoon Return Yellow Alert: परतीचा पावसाचा कोकण व मध्य महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

    Maharashtra Monsoon Return Yellow Alert:   मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असतानाच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी अत्यंत पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः खबरदारीचा उपाय म्हणून हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या ३ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि उन्हाचा चटका कायम राहणार असून, शेतकरी बांधवांनी विजा आणि वादळी वाऱ्यांपासून आवश्यक ती काळजी घेऊन शेतीकामांचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 30 Sep 2026 09:55 AM (IST)

    30 Sep 2026 09:55 AM (IST)

    BMC Junior Engineer Recruitment: मुंबई महापालिकेत ३९० कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा 

    BMC Junior Engineer Recruitment: मुंबई महानगरपालिकेच्या मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) भरती प्रक्रियेला अखेर मोठा वेग मिळाला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी 'डिप्लोमा' (पदविका) हीच पात्रता पूर्णपणे ग्राह्य धरावी, असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने सुमारे ३९० पदांच्या भरती प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत. बीएमसीकडून २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या भरतीत केवळ अभियांत्रिकी पदवीधारकांनाच (Degree Holders) संधी द्यावी अशी मागणी करत काही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया प्रलंबित राहिली होती. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे गेल्या दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो डिप्लोमाधारक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 30 Sep 2026 09:45 AM (IST)

    30 Sep 2026 09:45 AM (IST)

    Igatpuri Rice Adulteration Scandal: घोटीमध्ये परराज्यातील तांदळाची मोठी भेसळ 

    Igatpuri Rice Adulteration Scandal:  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे परराज्यातून हलक्या दर्जाचा तांदूळ आणून त्यात मोठी भेसळ केली जात असल्याचा गंभीर आरोप करत भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे आक्रमक झाले आहेत. या भेसळयुक्त तांदळाची प्रसिद्ध इगतपुरी, घोटी व त्र्यंबकेश्वरच्या नावाने देशभर विक्री केली जात असल्यामुळे संपूर्ण तालुक्याची मोठी बदनामी होत असल्याचा दावा नाठे यांनी केला आहे. ग्राहकांची फसवणूक आणि तालुक्याची डागाळणारी प्रतिमा रोखण्यासाठी या रॅकेटची तातडीने सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

  • 30 Sep 2026 09:35 AM (IST)

    30 Sep 2026 09:35 AM (IST)

    INDIA Bloc Opposition Meeting: दिल्लीत 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक 

    INDIA Bloc Opposition Meeting:  नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे आज सकाळी ११ वाजता 'इंडिया' (INDIA) आघाडीतील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व खासदार सुप्रिया सुळे हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) सहभागी होणार आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अनुपस्थित राहून त्यांच्या प्रतिनिधीला पाठवत आहेत, तर तमिळनाडूतील काँग्रेसच्या भूमिकेवर नाराज असलेला द्रमुक (DMK) पक्ष आणि आम आदमी पार्टी (AAP) यांनी या बैठकीपासून दुरावा ठेवल्याने विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

  • 30 Sep 2026 09:25 AM (IST)

    30 Sep 2026 09:25 AM (IST)

    Asian Games 2026 Gold In Archery: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाची सुवर्ण कामगिरी 

    Asian Games 2026 Gold In Archery:  जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. चिकिता तनिपार्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांचा समावेश असलेल्या भारतीय त्रिकुटाने अंतिम सामन्यात चीनवर २३८-२३४ अशी मात करत आपले आशियाई अजिंक्यपद कायम राखले. या दणदणीत विजयासोबतच भारतीय संघाने विश्वविक्रमाशी (World Record) बरोबरी साधत जागतिक तिरंदाजीत पुन्हा एकदा भारताचा दबदबा सिद्ध केला आहे.

  • 30 Sep 2026 09:12 AM (IST)

    30 Sep 2026 09:12 AM (IST)

    Contempt Petition Against Sanjay Raut: न्यायव्यवस्थेवर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस 

    Contempt Petition Against Sanjay Raut:   न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींवर वादग्रस्त व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या गंभीर आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अवमान याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांच्या खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते अमित देशपांडे यांनी वकील शैलेन्द्र गंगाखेडकर यांच्यामार्फत ही याचिका सादर केली असून, आता या उच्च न्यायालयातील अवमान याचिकेवर पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

  • 30 Sep 2026 09:05 AM (IST)

    30 Sep 2026 09:05 AM (IST)

    Agarkar Tenure Ends BCCI Selection Committee: अजित आगरकर यांचा बीसीसीआयसोबतचा करार  संपला;  

    Agarkar Tenure Ends BCCI Selection Committee:  गुवाहाटी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीला अध्यक्ष अजित आगरकर अनुपस्थित राहिल्याने सर्वात वरिष्ठ निवडकर्ते प्रज्ञान ओझा यांनी बैठकीची सूत्रे हाती घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतचा (BCCI) अजित आगरकर यांचा करार ४ ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे संपत असून त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. क्रिकेट वर्तुळातील वृत्तानुसार, आगरकर यांच्यानंतर बीसीसीआय आता निवड समितीच्या अध्यक्षपदाची किंवा अधिक महत्त्वाच्या वरिष्ठ पदाची जबाबदारी प्रज्ञान ओझा यांच्याकडे सोपवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, भारतीय क्रिकेटच्या निवड समितीमध्ये आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

Maharashtra to World Breaking News :

ठाण्यातील मानपाडा भागात शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आशियाई खेळ २०२६ मध्ये भारतीय महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने विश्वविक्रमाशी बरोबरी करत देशाला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले.

अरबी समुद्रात आणि उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एमपीएससीने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ सह तीन प्रमुख परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा आणि मागील परीक्षांच्या गुणपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकन सैन्याने इराक मधील आपल्या सर्व लष्करी तळांवरून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून २ दशकांनंतर तेथील लष्करी मोहिमेचा शेवट झाला आहे. अमेरिकेने दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या आयातीवर भारतासह १९ देशांना शून्य-शुल्क (Zero-Tariff Waiver) सूट देण्याची घोषणा केली.

 

Web Title: Marathi newsmaharashtra and india breaking news live updates 30 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • crime news
  • international news
  • maharashtra breaking news
  • Marathi News
  • national news
  • Sports News
  • Tech News

संबंधित बातम्या

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
1

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
2

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
3

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय
4

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.