Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

व्हॉट्सॲपच्या नेव्हिगेशन बारला एक नवीन रुप मिळणार आहे. कंपनी हा बदल केवळ अँड्रॉईड यूजर्ससाठी करत आहे. सध्या हे नवीन अपडेट सर्व बीटा यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले नाही. या नव्या अपडेटनंतर यूजर्सचा अनुभव बदलणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2026 | 02:26 PM
अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Follow Us
Follow Us:
  • अँड्रॉईड ॲपच्या बॉटम नेव्हिगेशन बारला नव्या डिझाईनमध्ये सादर करण्याची कंपनीची तयारी
  • अँड्रॉईड ॲपमध्ये आयफोनवाले डिझाईन जसेच्या तसे कॉपी केले जाणार नाही
  • नव्या डिझाईनमध्ये बॉटम नेव्हिगेशन बार स्क्रीनच्या इतर भागांपेक्षा थोडा वेगळा दिसणार
अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरणारे यूजर्स तयार आहात ना! लवकरच तुमचा व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार आहे. कारण अँड्रॉईड यूजर्ससाठी लवकरच ॲपचा इंटरफेस बदलणार आहे. कंपनी अँड्रॉईड ॲपच्या बॉटम नेव्हिगेशन बारला नव्या डिझाईनमध्ये सादर करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवे नेव्हिगेशन बार आयफोनवरील व्हॉट्सॲपच्या इंटरफेससोबत मिळता-जुळता आहे. अँड्रॉईडसाठी या ॲपचे डिझाईन गूगलच्या डिझाईन गाइडलाइंसनुसार ठेवले जाणार आहे.

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

नवीन अपडेट सर्व बीटा यूजर्ससाठी उपलब्ध नाही

हा बदल सध्या व्हॉट्सॲप बिटा फॉर अँड्रॉईडच्या वर्जन 2.26.38.10 मध्ये डेव्हलपमेंट स्तरावर पाहायला मिळाला आहे. याचा अर्थ असा आहे की, अद्याप हे नवीन अपडेट सर्व बीटा यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले नाही. त्यामुळे सामान्य यूजर्सपर्यंत हे अपडेट पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. नव्या डिझाईनमध्ये बॉटम नेव्हिगेशन बार स्क्रीनच्या इतर भागांपेक्षा थोडा वेगळा दिसणार आहे. याच्या चारही बाजूला गोलाकार कोपरे दिसणार आहेत, ज्यामुळे हे एका फ्लोटिंग बारसारखे दिसू शकते. हे डिझाईन सध्याच्या नेव्हिगेशनच्या तुलनेत अधिक मॉडर्न लुक देईल. (फोटो सौजन्य: Pinterest) 

लाईट थिममध्ये सहजपणे दिसणार नवीन डिझाईन

या बदलामध्ये केवळ बारचा आकारच नाही, तर त्यातील टॅब्स आणि कंट्रोल्सचे व्हिज्युअल डिझाईन यांचाही समावेश असू शकतो. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, लाईट थिममध्ये हे नवीन डिझाईन आणखी सहजपणे पाहायला मिळणार आहे तर डार्क थीममध्ये हा बदल कमी दिसू शकतो. व्हॉट्सॲपचे नवीन अँड्रॉईड डिझाईन आयफोन ॲपच्या फ्लोटिंग टॅब बारसारखेच असल्याचे सांगितलं जात आहे. आयओएसवर व्हॉट्सॲपने ॲपलच्या नव्या लिक्विड ग्लास डिझाईनला अनुरुप फ्लोटिंग आणि राउंडेड नेविगेशन एलिमेंट सादर केले आहे. अँड्रॉईडवर देखील अशाच प्रकारचे फ्लोटिंग कॉन्सेप्ट पाहायला मिळू शकते.

आयफोनवाले डिझाईन कॉपी केले जाणार नाही

तथापी, अँड्रॉईड ॲपमध्ये आयफोनवाले डिझाईन जसेच्या तसे कॉपी केले जाणार नाही. व्हॉट्सॲप अँड्रॉईडसाठी वेगळे डिझाईन तत्त्वे फॉलो करणार आहे. यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवर नेव्हिगेशनचा अनुभव एकसारखा दिसत असला तरी दोन्हीचे विझ्युअल डिझाईन वेगळे असणार आहे.

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

3 वर्षांपूर्वी केला होता बदल

व्हॉट्सॲपने अँड्रॉईड ॲपमध्ये मुख्य सेक्शन बॉटम नेव्हिगेशनमध्ये सुमारे 3 वर्षांपूर्वी शिफ्ट केले होते. बिटा वर्जन 2.23.10.6 सह चॅट्स, कम्युनिटीज, अपडेट्स आणि कॉल्सला स्क्रीनच्या खालील बाजूला शिफ्ट करण्यात आले होते. यामुळे यूजर्सना सेक्शनमध्ये स्विच करणं आणखी सोपे झाले होते. आता कंपनी याच नेव्हिगेशन बारला एक नवीन रुप देण्याचे काम करत आहे. नवीन डिझाईन यूजर्ससाठी कधी उपलब्ध होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Web Title: Whatsapp android users to get a new floating navigation bar with a modern interface

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
1

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
3

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
4

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.