72 हजार फोटो आणि बरंच काही... Tea App चा Data Leak, पुरूषांना रेट करणाऱ्या अॅपवर आलं मोठं संकट!
महिलांसाठी तयार करण्यात आलेलं खास अॅप म्हणजेच Tea App सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण म्हणजेच या अॅपचा डेटा लिक झाला आहे. हजारो फोटो आणि युजर्सची माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे, त्यामुळे सध्या युजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. Tea App महिलांमध्ये लोकप्रिय आहे. हे एक असं अॅप आहे, ज्यावर महिला पुरुषांना रेट करतात आणि रिव्ह्यू देतात.
Tea App वर महिला वर्तन, निष्ठा आणि डेटिंगचा अनुभव या गोष्टींच्या आधारावर पुरुषांना रेट करतात. विशेषत: महिला अशा पुरुषांना रेट करतात, ज्यांना त्या भेटल्या असतील. Tea App ची अनेक महिलांमध्ये क्रेझ आहे. मात्र हे अॅप गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून Tea अॅप एक डेटा ब्रीचबाबत चर्चेत आहे. Tea App एका मोठ्या डेटा लीकचा शिकार झाला आहे. यामध्ये 72 हजार फोटो लीक झाले आहेत. ज्यामध्ये 13 हजार सेल्फी किंवा सेल्फी फोटो ID यांचा समावेश आहे. हे असे फोटो आहेत, ज्यांना युजर्सना अकाउंट वेरिफिकेशनसाठी सबमिट केले होते. मात्र आता हे फोटो लिक झाल्यामुळे युजर्सनी चिंता व्यक्त केली होती. (फोटो सौजन्य –Tea App)
तर यातील 59 हजार फोटो असे आहेत, जे पोस्ट, कॉमेंट किंवा डायरेक्ट मेसेज केले आहेत आणि अॅपवर उपलब्ध आहेत. हे असे फोटो आहेत जे परवानगीशिवाय अॅक्सेस केले जाऊ शकतात. अद्याप अनेकांना माहिती नाही, हे अॅप कसं आहे, काय कामं करतं? याबाबत जाणून घेऊया.
Tea हे महिलांसाठी एक एक्सक्लूसिव अॅप आहे. या अॅपवर महिला अशा पुरुषांना रेट आणि रिव्ह्यु करू शकतात, ज्यांना त्या आधी भेटल्या आहेत. Tea हे एक असं अॅप आहे, जिथे महिला ‘टी स्पिल’ म्हणजेच वास्तविक जीवनातील रिव्ह्यु एकमेकांसोबत शेअर करतात. या रिव्ह्युद्वारे, इतर महिलांना कळते की त्यांना भेटलेली व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही कि तो फक्त टाइमपास करत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, TEA अॅपाच डेटा एक थर्ड पार्टी क्लाउडद्वारे लीक झाला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये महिलांची नाव आणि प्रोफाइल डीटेल्स यांचा समावेश आहे. याशिवाय, महिलांद्वारे रेट करण्यात आलेल्या पुरुषांची माहिती आणि रिव्ह्यु, फोटो आणि दुसरे डिटेल्स देखील लिक करण्यात आले आहेत.
कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, यूजर्सचे ईमेल आणि नंबर लीक झाले नाहीत. या डेटा लिकचा परिणाम केवळ अशा युजर्सवर परिणाम होणार आहे, ज्यांनी फेब्रुवारी 2024 पूर्वी साईन अप केले होते. याशिवाय Tea ने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, या अॅपवरील युजर्सची संख्या 40 लाख पार गेली आहे.