Price Dropped: Samsung Galaxy S25 Ultra 5G वर मिळतंय मोठं डिस्काऊंट! 25 हजार रुपयांनी कमी झाली किंमत, असा घ्या ऑफर्सचा फायदा
तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन त्यांच्या ग्राहकांसाठी एक बेस्ट डिल घेऊन आला आहे. ज्यामध्ये ग्राहक अगदी कमी किंमतीत सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Ultra 5G खरेदी करू शकणार आहेत. कोणत्याही बँक ऑफरशिवाय, तुम्ही हे डिव्हाइस 1 लाख 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. इतकेच नाही तर फोनवर काही खास बँक आणि कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते.
Tech Tips: तुमचं नाव आणि फोटो वापरून कोणी दुसरच चालवतंय Instagram Account? ताबडतोब करा हे काम
बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह या प्रिमियम डिव्हाईसची किंमत आणखी कमी होते. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली डिव्हाइस आहे. या दमदार स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आली आहे. कॅमेऱ्याचा विचार केला तर स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy S25 Ultra 5G हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आता तुम्ही कोणत्याही बँक ऑफरशिवाय हा प्रिमियम स्मार्टफोन केवळ 1,04,990 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. म्हणजेच, फोनवर सुमारे 25,000 रुपयांची फ्लॅट सूट दिली जात आहे. याशिवाय, फोनवर काही कॅशबॅक ऑफर आणि बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही देखील एखाद्या प्रिमियम डिव्हाईसच्या शोधात असाल तर हे डिव्हाईस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
स्मार्टफोनवरील बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह या फोनवर 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करत आहे. कंपनी फेडरल बँक क्रेडिट कार्डसह 2000 रुपयांर्यंत डिस्काऊंट देण्याचा दावा करत आहे. येस बँक क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह, तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे, BOBCARD EMI पर्यायासह, तुम्हाला फोनवर 1250 रुपयांची सूट मिळू शकते.
या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 6.9-इंच QHD+ डायनामिक AMOLED 2X स्क्रीन देण्यात आली आहे. चांगल्या विजुअल आणि इंटरॅक्शनसाठी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील आहे. फोनमध्ये लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर डिव्हाईसमध्ये मागील बाजूला क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये अल्ट्रा-हाय-रिजॉल्यूशन फोटोग्राफीसाठी 200MP चा प्रायमरी सेंसर आणि 50MP चा अल्ट्रावाइड लेंस दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.