
तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त
पोलिसांनी केलेल्या तपासात असं समोर आले आहे की, आरोपी मदरबोर्ड, कॅमेरा मॉड्यूल, बॅटरी आणि फोन फ्रेमसारखे महत्त्वाचे पार्ट्स चीनसह इतर देशांमधून मागवत होते. यानंतर या पार्ट्सच्या मदतीने स्थानिक पातळीवर असे स्मार्टफोन्स तयार केले जात होते, जे अगदी खऱ्या Samsung Galaxy डिव्हाईससारखे दिसतील. अशा देखील काही घटना होत्या, जिथे फोन तयार करण्यासाठी खोटे किंवा जनरल पार्ट्सचा देखील वापर केला जात होता. ज्यामुळे स्मार्टफोन बनवण्याचा खर्च कमी येतो आणि फायदा जास्त होतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
फोन खरा वाटावा यासाठी आरोपी फोनवर खोटे IMEI स्टिकर लावत होते, ज्यावर Made in Vietnam असं लिहीलं होतं. यामुळे ग्राहकांना असे वाटले की हे फोन खरे आयात केलेले सॅमसंग डिव्हाईस आहेत आणि ते टेलिकॉम नेटवर्कच्या सुरुवातीच्या तपासणीतूनही सुटले. मात्र खरं तर हे स्मार्टफोन्स खोटे होते आणि यांचा वापर ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी केला जात होता.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स किंवा रिटेल स्टोअर्सचा विचार केला तर Samsung Galaxy Ultra आणि फोल्डेबल फोनची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. पण आरोपींनी तयार केलेले नकली स्मार्टफोन्स ग्राहकांना 35,000 ते 40,000 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत होती. ही किंमत पाहून ग्राहक डिस्काऊंट आणि ऑफर समजून स्मार्टफोन खरेदी करत होते. मात्र खरं तर ग्राहक खोट्या ऑफर्सचे शिकार बनत होते, जिथे त्यांची फसवणूक केली जात होती. पोलिसांचे म्हणणे आहे की too good to be true किंमती हे या रॅकेटचे सर्वात मोठे शस्त्र होते.
भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम
करोल बागमध्ये झालेल्या या घटनेत पोलिसांनी 512 बनावट सॅमसंग गॅलेक्सी फोन, शेकडो सुटे इलेक्ट्रॉनिक भाग, पॅकेजिंग साहित्य, स्टिकर्स आणि असेंब्ली टूल्स जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या सर्व प्रकरणानंतर स्मार्टफोन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. स्मार्टफोन नेहमी अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करा. ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घेण्यापूर्वी व्यवस्थित तपासणी करा.