भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम
सॅलरीसेचे सह-संस्थापक मोहित गोरिसारिया म्हणाले, “भारतातील पगारदार वर्गाचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान आणखी उंचावण्यासाठी सॅलरीसेचे अस्तित्व आहे. लेव्हल अप क्रेडिट कार्ड पगारदारांना ज्यासाठी ते पात्र आहेत असे लाभ देऊन क्रेडिटमध्ये औचित्य आणतो. UPI वर क्रेडिट कार्ड, प्रत्यक्ष जीवनाशी निगडित रिवॉर्ड्स, लाऊंज अॅक्सेस आणि कमी फॉरेक्स मार्क-अप सारखे लक्झरी लाभ आणि अनुमान केलेली आर्थिक लवचिकता यांसह, हे उत्पादन लक्षावधी कामकाजी व्यावसायिकांसाठी पैशाचे व्यवस्थापन सुलभ करते आणि त्यांचे जीवनमान उंचावते. देशभरात जबाबदार आणि डिजिटल-फर्स्ट क्रेडिटचा अंगिकार संभव करण्यासाठी सिटी युनियन बँकेशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”
सिटी युनियन बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विजय आनंद आर. म्हणाले, “युपीआयवर क्रेडिट कार्डसह आम्ही क्रेडिट अॅक्सेसचे एक आधुनिक, सुरक्षित आणि ग्राहक-केंद्रित मॉडेल सक्षम करत आहोत. पगारदार वर्ग हा भारताच्या कन्झम्प्शन अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे आणि सॅलरीसे सोबत केलेली ही भागीदारी क्रेडिटच्या शिस्तबद्ध वापराला प्रोत्साहन देत असतानाच डिजिटल समावेशकता विस्तारित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. या आगळ्यावेगळ्या ऑफरिंगला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. सॅलरीसे सोबत अशी आणखी उत्पादने तयार करण्याची आमची योजना आहे.”
लेव्हल अप क्रेडिट कार्डमध्ये भारताचे पहिले ‘सॅलरी डे बोनस’ फीचर दाखल केले आहे. ज्यामध्ये पगार मिळाल्याच्या दिवशी ३७.५% पर्यंत रिवॉर्ड देऊ करण्यात आले आहेत. यामुळे पगारदार कर्मचारी आपल्या वेतन चक्राशी सुसंगत राहून केलेल्या अत्यावश्यक खर्चावर महत्तम परतावा मिळवू शकतील. पारंपरिक क्रेडिट कार्ड्स निवडक वापरावर रिवॉर्ड्स देऊ करतात, तर ही ऑफर क्रेडिटची युपीआय ईकोसिस्टमशी बेमालूम सांगड घालते आणि नियोक्ता-निगडित पगार तपासणीच्या माध्यमातून शिस्तबद्ध क्रेडिट अॅक्सेस कायम ठेवते. ग्राहक सॅलरीसे अॅपच्या माध्यमातून या क्रेडिट कार्डचा तसेच इतर अनेक खास बनवलेल्या उत्पादनांचा लाभ घेऊ शकतात.
ही भागीदारी सॅलरीसेचे वेतन-आधारित आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिटी युनियन बँकेच्या स्थापित विश्वास आणि नियामक चौकटीचा लाभ घेते. यूझर्सना दैनंदिन युपीआय व्यवहारांमध्ये थेट रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट लाइन्सपर्यंत पोहोच मिळते, ज्यामुळे स्वतंत्र कर्ज अर्जाची गरज राहात नाही आणि पगाराशी पद्धतशीरपणे संबंधित मार्गाने जबाबदार क्रेडिट वापराची खातरजमा होते. ही भागीदारी कामकाजी व्यावसायिक सेगमेन्टपर्यंत युपीआयवर क्रेडिट कार्डच्या सुविधा विस्तारीत करून भारताच्या डिजिटल पेमेंट्स ईकोसिस्टम बळकट करते. रूपे एकीकरण आणि एनपीसीआयच्या क्रेडिट ऑन युपीआय फ्रेमवर्कच्या माध्यमातून हे कार्ड पारदर्शक आणि सुरक्षित क्रेडिट अॅक्सेस देऊ करते आणि देशाच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू असलेल्या संक्रमणाला पाठबळ देते.






