Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

दिवाळीत सेल आणि ऑफर्स सुरु होताच, सायबर गुन्हेगार देखील ॲक्टिव्ह होतात. या काळात लोकांना बनावट लिंक आणि मेसेज पाठवून त्यांची फसवणूक केली जाते. आता आम्ही तुम्हाला अशाच 5 फ्रॉड्सबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2026 | 09:45 AM
दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान... या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान... या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

Follow Us
Follow Us:
  • सेल आणि ऑफर्सच्या काळातच सायबर गुन्हेगार संधी शोधून लोकांची फसवणूक करतात
  • ऑनलाईन शॉपिंग करताना सावध राहणं अत्यंत गरजेचं
  • सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या काळात सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करतात
अवघ्या काही दिवसांत दिवाळी सुरु होणार आहे. दिवाळीनिमित्त अनेक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळतं. यामुळे लोकं स्मार्टफोन, लॅपटॉप, कपडे, घरातील सजावटींच्या वस्तूंसह अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी करतात. पण ऑनलाईन शॉपिंग करताना सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सेल आणि ऑफर्सच्या काळातच सायबर गुन्हेगार संधी शोधून लोकांची फसवणूक करतात आणि त्यांचे बँक अकाऊंट रिकामे करतात. आता आम्ही तुम्हाला 5 अशा सायबर फ्रॉडबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लोकांची अगदी सहज फसवणूक केली जाऊ शकते.

शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन

बनवाट शॉपिंग वेबसाईट

सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या काळात सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करतात, ज्या हुबेहुब खऱ्या वेबसाईटसारख्या दिसतात. या बनावट वेबसाईट्सवर स्मार्टफोन, टिव्ही आणि इतर वस्तू अत्यंत कमी किंमतीत विकण्याचा दावा केला जातो. या ऑफर्स पाहून ग्राहक आकर्षित होतात आणि बनवाट वेबसाईटवरून सामान ऑर्डर करतात. पण पेमेंट केल्यानंतर वस्तू डिलीवर केली जात नाही किंवा डॅमेज प्रोडक्ट डिलीव्हर होते. यामुळे स्कॅम आणि फ्रॉडपासून सुरक्षा करण्यासाठी नेहमी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करा. (फोटो सौजन्य: Pinterest) 

सोशल मीडियावरील बनावट जाहिराती

दिवाशी सुरु होण्याआधीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे इंस्टाग्राम आणि फेसबूक दिवाळीच्या नावाने विविध जाहिराती दिसतात. या जाहिरातींमध्ये ब्रँडेड प्रोडक्ट्सवर 70 ते 80 टक्के डिस्काऊंट ऑफर करण्याचा दावा केला जातो. तसेच शॉपिंगसाठी एक लिंक देखील दिली जाते. या लिंक ग्राहकांना बनावट वेबसाईटवर घेऊन जातात, जिथे ग्राहकांची फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील ऑफर्स तपासा.

क्यूआर कोड आणि फ्रॉड

दिवाळीपूर्वी सायबर गुन्हेगार दिवाळी गिफ्ट, कॅशबॅक किंवा इतर बक्षीसे जिंकण्यासाठी बनावट क्यूआर कोड तुम्हाला पाठवता. हे कोड स्कॅन करून तुम्हाला यूपीआय पिन एंटर करण्याचा पर्याय येतो. पिन एंटर करताच तुमचं अकाऊंट रिकामं होतं. लक्षात ठेवा की, पैसे रिसीव्ह करण्यासाठी कोणताही क्यूआर कोड नसतो, तसेच यूपीआय पिन देखील एंटर करावा लागत नाही.

फेक डिलीवरी आणि रिफंड स्कॅम

सायबर गुन्हेगार बनावट मेसेज करतात, ज्यामध्ये लिहीले असते की, तुमची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे किंवा पार्सल वेळेत पोहोचू शकत नाही. यात डिलिव्हरीची वेळ बदलण्याची विनंती असू शकते, किंवा तुम्हाला परतावा (रिफंड) मिळवण्यासाठी एखादी लिंक पाठवली जाऊ शकते. अशा लिंक्सवर क्लिक करून तुम्हाला बँक डिटेल्स एंटर करण्यास सांगितलं जाऊ शकतं. यानंतर तुम्ही दिलेल्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करू शकतात.

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा

फेक कॅशबॅक आणि गिफ्ट्स

दिवाळीच्या काळात, बक्षिसांच्या ऑफर्स, विशेष शॉपिंग बोनस किंवा कॅशबॅकच्या आमिषातून लोकांना लक्ष्य केले जाऊ शकते. फसवणूक करणारे लोक, ही बक्षिसे मिळवण्यासाठी, व्यक्तींना काही लिंकवर क्लिक करायला, बनावट फॉर्म भरायला किंवा ‘प्रोसेसिंग फी’ भरायला सांगू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीच्या ऑनलाइन शॉपिंगमध्ये कोणते सायबर फ्रॉड होऊ शकतात?

    Ans: दिवाळीच्या सेलमध्ये बनावट शॉपिंग वेबसाइट्स, सोशल मीडियावरील फेक जाहिराती, QR कोड स्कॅम, बनावट डिलिव्हरी मेसेज आणि फेक कॅशबॅक ऑफर्सद्वारे फसवणूक होऊ शकते.

  • Que: बनावट शॉपिंग वेबसाइट कशी ओळखायची?

    Ans: वेबसाइटची URL काळजीपूर्वक तपासा. अवास्तव स्वस्त ऑफर्स, चुकीचे स्पेलिंग, संशयास्पद पेमेंट लिंक आणि अपूर्ण संपर्क माहिती असल्यास सावध राहा. शक्यतो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरूनच खरेदी करा.

  • Que: दिवाळीच्या ऑफर्सच्या नावाने सोशल मीडियावर फसवणूक कशी होते?

    Ans: सायबर गुन्हेगार Instagram आणि Facebook वर आकर्षक डिस्काउंटच्या बनावट जाहिराती देतात. त्यातील लिंकवर क्लिक केल्यास बनावट वेबसाइटवर नेले जाऊ शकते आणि तुमची वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती चोरली जाऊ शकते.

Web Title: Diwali online shopping scams 5 cyber frauds you must avoid to keep your bank account safe hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन
1

शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा ‘या’ ट्रिक्स
2

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा ‘या’ ट्रिक्स

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती
3

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती

Tech Tips: आता iPhone बनेल रिमोट कॅमेरा! फक्त आवाजाने क्लिक करा फोटो, ही ट्रिक वापरा
4

Tech Tips: आता iPhone बनेल रिमोट कॅमेरा! फक्त आवाजाने क्लिक करा फोटो, ही ट्रिक वापरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.