
Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनच्या किंमतीत 3 हजार रुपयांपर्यंतची वाढ केली जाणार आहे. या नवीन किंमती 15 नोव्हेंबर 2026 पासून लागू केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांकडे आता स्वस्त लावा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी आहे. मात्र त्यानंतर ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
सेमीकंडक्टर आणि घटक पुरवठा साखळीमध्ये मेमरी मॉड्यूल्सची कमतरता दिसून येत आहे, ज्याचा परिणाम मूळ उपकरण उत्पादकांच्या (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स) खरेदी खर्चावर झाला आहे. लावाचं असं म्हणणं आहे की, हा बदल उद्योगातील अशा व्यापक परिस्थितीचे प्रतिबिंब आहे, जिथे हार्डवेअर इनपुटच्या किमती वाढल्या आहेत. सध्याच्या सणासुदीच्या खरेदीच्या हंगामादरम्यान कंपनीद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. या काळात प्रमुख किरकोळ विक्री केंद्रे सहसा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर प्रमोशनल डिस्काऊंट ऑफर करत असतात.
अशातच लावाने एक मोठी घोषणा केली आहे. तसेच, कंपनीने स्पष्ट केले आहे की, उपलब्ध असलेला साठा मुदत संपेपर्यंत आधी ठरवलेल्या सवलतीच्या दरांवरच विकला जाईल. कंपनीने अद्याप कोणत्या स्मार्टफोनची किंमत किती रुपयांनी वाढवली जाणार आहे, याची अचूक माहिती जारी केली नाही. त्यामुळे नवीन किमंतीसाठी ग्राहकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत
नुकत्याच करण्यात आलेल्या या घोषणेबाबत लावाने सांगितलं की, मेमरीच्या सततच्या कमतरतेमुळे, आमच्या स्मार्टफोन पोर्टफोलिओच्या किमतींमध्ये 3,000 रुपयांपर्यंत वाढ करणे आवश्यक झाले आहे. 15 नोव्हेंबर 2026 पासून हा बदल लागू केला जाणार आहे. जर तुम्ही तुमटे डिव्हाईस अपग्रेड करण्याची योजना आखत असाल तर ग्राहकांसाठी 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत उत्तम संधी उपलब्ध आहे. कारण सध्या सणानिमित्त आमचे प्रोडक्ट्स प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि ऑफलाइन किरकोळ विक्री नेटवर्कवर विशेष किमतींत उपलब्ध आहेत. किमतींत होणारा हा बदल लागू होण्यापूर्वीच ग्राहकांनी सुरू असलेल्या ऑफर्सचा लाभ घ्यावा, ज्यामुळे नंतर त्यांनी नवीन प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत.
Ans: लावा कंपनीच्या स्मार्टफोनच्या किमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
Ans: कंपनीच्या घोषणेनुसार, नवीन किमती 15 नोव्हेंबर 2026 पासून लागू होणार आहेत.
Ans: जागतिक स्तरावर मेमरी चिप्सच्या पुरवठ्यात येणारी कमतरता आणि हार्डवेअर घटकांच्या वाढलेल्या किमतींमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.