
Tech Tips: लॅपटॉप चार्जिंगला लावून कधीही करू नका ही कामं! नाहीतर होईल अनर्थ, तात्काळ बदला तुमची सवयी
लॅपटॉप चार्जिंगला लावला असेल तेव्हा हाय-ग्राफिक्स गेम खेळणं किंवा व्हिडीओ एडीटींग करणं चुकीचं आहे. असे केल्यामुळे प्रोसेसर आणि ग्राफिक्स कार्डवर जास्त दाब निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे लॅपटॉप गरम होऊ शकतो. यामुळे ओव्हरहिटींग होते आणि लॅपटॉपची बॅटरी लाईफ कमी होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य: Pinterest)
आरामात काम करण्यासाठी अनेक लोकं लॅपटॉप अंथरूण किंवा उशीवर ठेवतात. विशेषत: जेव्हा लॅपटॉप चार्जिंगला लावला असेल तेव्हा अंथरूण किंवा उशीवर ठेवणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे गरम हवा बाहेर जात नाही आणि ओव्हरहिटींग होऊ शकते. ही सवय बॅटरी आणि मदरबोर्ड दोन्हीसाठी धोकादायक ठरू शकते.
रात्रभर लॅपटॉप चार्जिंगला लावणं अत्यंत मोठी चूक आहे. आधुनिक लॅपटॉपमध्ये ओवरचार्ज प्रोटेक्शन असले तरी देखील जर सतत तुम्ही लॅपटॉप 100 टक्के चार्ज केला तर बॅटरी लाईफ खराब होऊ शकते. त्यामुळे वेळीच चार्जर डिस्चार्ज करणं गरजेचं आहे.
लॅपटॉपला चार्ज करताना नेहमी ओरिजिनल चार्जरचा वापर करा. स्वस्त किंवा लोकल चार्जरचा वापर केल्यास लॅपटॉप गरम होऊन ब्लास्ट देखील होऊ शकतो. चुकीचे वोल्टेज किंवा अनस्टेबल करंट यामुळे बॅटरी लाईफ खराब होण्याची देखील शक्यता असते. काहीवेळेस संपूर्ण डिव्हाईसवर परिणाम होण्याची शक्यता असते.
चार्जिंग दरम्यान लॅपटॉपचा वापर करण्यापेक्षा तुम्ही डिव्हाईस शटडाउन किंवा स्लीप मोडमध्ये ठेऊ शकता. यामुळे बॅटरीवर दाब येत नाही आणि चार्जिंग अत्यंत सुरक्षित पद्धतीने होते.
काही योग्य नियम आणि सवयींचे पालन केले तर तुमच्या लॅपटॉपचे आयुष्य वाढू शकते. तुम्हाला जर तुमचा लॅपटॉप दिर्घकाळ वापरायचा असेल तर तुम्ही या लेखात सांगितलेल्या नियमांचे पालन करू शकता.