Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?
आयफोन आणि अँड्रॉईड यूजर्ससाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आहे. टेक विश्वात एक मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन मोठ्या टेक कंपन्या आता एकत्र आल्या आहे. Apple ने Google सोबत हातमिळवणी केली आहे. टेक जायंट कंपनी अॅपलने कंफर्म केलं आहे की, आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॉईस असिस्टेंट Siri मध्ये गूगल जेमिनी इंटिग्रेट केले जाणार आहे. खंर तर कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण टेक विश्व हादरलं आहे. या निर्णयाचा प्रत्येक स्मार्टफोन आणि आयफोन यूजरवर परिणाम होणार आहे. टेक जायंट कंपन्यांनी हा निर्णय का घेतला, याचे कारण काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
अॅपल आणि गुगल यांनी घेतलेला हा निर्णय लाखो आयफोन यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. गूगल जेमिनी एआय सिरीमध्ये इंटिग्रेट झाल्यानंतर आईफोन, आयपॅड, मॅक यूजर्ससाठी वॉइस असिस्टेंट अधिक पर्सनलाइज्ड होणार आहे. यावर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या WWDC 2026 मध्ये टेक जायंट कंपनी अॅपल याची घोषणा करण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
गूगल कीवर्ड ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अॅपलने अखेर मान्य केलं आहे की, गूगलची एआय टेक्नोलॉजी अॅपल फाउंडेशन मॉडेलससाठी सर्वात प्रभावशाली ठरणार आहे. अॅपल आणि गुगल यांनी हे स्टेटमेंट गूगल कीवर्ड ब्लॉगमध्ये पब्लिश केले आहे. यापूर्वी देखील ब्लूमबर्गच्या मार्क गुरमानने नोव्हेंबर 2025 मध्ये एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, अॅपलने सिरी अपडेटसाठी गूगलची निवड केली आहे. यासाठी टेक कंपनी अॅपल दरवर्षी 1 बिलियन डॉलर खर्च करणार आहे.
अँड्रॉइड ऑथिरिटीने शेअर केलेल्या नवीन रिपोर्टनुसार, दोन्ही कंपन्यांनी पहिल्यांदाच या कराराची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. तथापी, यामध्ये दोन्ही कंपन्यांनी 1 बिलियन डॉलरच्या डीलबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नाही. अॅपलने 2024 च्या पहिल्या सहामाहित घोषणा केली होती की, सिरीमध्ये एआय फीचर्स जोडले जाणार आहेत. नंतर हा प्रोजेक्ट गेल्या वर्षी मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला.
ब्लूमबर्गने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, अॅपल अधिकाऱ्यांना वाटलं होतं की, हे फीचर त्यांच्या चाचणीवेळी व्यवस्थित काम करत नाही. कंपनीने iOS 26.4 अपडेटसह सिरीमध्ये गूगल जेमिनी जोडण्याची तयारी केली आहे. हे अपडेट येणाऱ्या काही महिन्यांतच रोल आऊट केलं जाऊ शकते. गुगल जेमिनीच्या समावेशासह, आयफोनच्या सिरीमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशनसारखे फीचर्स देखील उपलब्ध होतील. हे फीचर iMessage सारख्या Apple अॅप्समध्ये काम करेल. सध्या अॅपलचे सर्व प्रोडक्ट्स OpenAI च्या ChatGPT सह इंटिग्रेट आहेत.






