Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान… सरकारने दिला इशारा

Call Forwarding Scam Alert: सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत असून आता स्कॅमर्सनी नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. कॉल फॉरवर्डिंगच्या माध्यमातून ओटीपी आणि महत्त्वाची माहिती चोरण्याचा धोका वाढल्याने सरकारने नागरिकांना विशेष सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2026 | 11:44 AM
Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान... सरकारने दिला इशारा

Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान... सरकारने दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • कॉल फॉरवर्डिंग अ‍ॅक्टिव्ह झाल्यास येणाऱ्या एसएमएस अलर्टकडे दुर्लक्ष केल्यास स्कॅमर्स तुमचे ओटीपी आणि बँकिंगशी संबंधित माहिती चोरू शकतात.
  • I4C आणि CyberDost ने नागरिकांना सावध करत अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही कॉल फॉरवर्डिंग कोड डायल करू नका, असा सल्ला दिला आहे.
  • जर तुमच्या नंबरवर विनापरवानगी कॉल फॉरवर्डिंग सुरू झाले असेल, तर फोनच्या डायलपॅडवर ##002# डायल करून ते तात्काळ बंद करता येते.
सरकारने सायबर फ्रॉडबाबत एक नवीन इशारा जारी केला आहे. आतापर्यंत स्कॅमर्स यूजर्सच्या फोनमधील ओटीपी आणि बँक डिटेल्स चोरण्यासाठी प्रयत्न करत होते. यासाठी यूजर्सना वेगवेगळ्या पद्धतीने लिंक देखील पाठवल्या जात होत्या. मात्र आता स्कॅमर्स एक पाऊल पुढे जात यूजर्सची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांची माहिती चोरण्यासाठी एक नवीन पद्धत वापरत आहेत. याबाबत सरकारने इशारा देत देशभरातील नागरिकांना सावध राहण्यास सांगितलं आहे.

JioHotstar ने रचला इतिहास! 45.1 करोड अ‍ॅक्टिव मंथली यूजर्ससह बनला भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म

CyberDostI4C ने शेअर केली एक्स पोस्ट

गृह मंत्रालयच्या सायबर सिक्योरिटी विंग I4C ने सायबर दोस्तच्या माध्यमातून लोकांना सावध केलं आहे. तुम्ही तुमच्या फोनवर येणाऱ्या एसएमएसकडे दुर्लक्ष करत असाल तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते आणि परिणामी तुमचं मोठं नुकसान होऊ शकत. त्यामुळे तुमच्या फोनवर येणाऱ्या प्रत्येक मेसेज अलर्टवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CyberDostI4C ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर सांगितलं आहे की, स्कॅमर्सना धडा शिकवण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने एक नवीन प्रणाली लागू केली आहे. यामध्ये जर तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले, तर एसएमएसद्वारे तुम्हाला याबाबत तात्काळ सूचना दिल्या जातात. वेगाने वाढणाऱ्या सायबर फ्रॉडला थांबवण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

That SMS about call forwarding is not just another notification. It could be an early warning that your number is being misused pic.twitter.com/dxWru2zNZ8 — CyberDost I4C (@Cyberdost) June 18, 2026

या मेसेजकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

सायबर दोस्तने सांगितलं आहे की, जर तुमच्या मोबाईल नंबरवर कॉल फॉरवर्डिंग अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले, तर ताबडतोब रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर याबाबत एसएमएस अलर्ट पाठवला जातो. जर तुम्ही कॉल फॉरवर्डिंग अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी कोणताही अर्ज केला नसेल तर तात्काळ हे फीचर डिसेबल करणं गरजेचं आहे.

कॉल फॉरवर्डिंग डिसेबल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर डायल पॅडमध्ये जाऊन ##002# डायल करावे लागेल. हा नंबर डायल करताच कॉल फॉरवर्डिंग तात्काळ बंद होणार आहे. तसेच, सरकारने लोकांना सूचना दिल्या आहेत की, व्हेरिफाय न करता तुमच्या मोबाईल नंबरवर कोणाच्याही सांगण्यावरून कॉल फॉरवर्डिंग कोड्स डायल करू नका. असं केल्यास तुमच्या मोबाईल नंबरवर येणारे इनकमिंग कॉल्स कोणत्याही दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केले जातील.

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

चुकूनही करू नका हे काम

सायबर गुन्हेगार तुमच्या नंबरवर कॉल करून ओटीपीची विनंती करू शकतात, जो नंतर कॉल फॉरवर्डिंगद्वारे त्यांच्या नंबरवर पाठवला जातो. ओटीपी मिळताच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकत. तसेच तुमच्या डिजिटल ओळखीसोबत देखील छेडछाड करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला नेहमी कॉल फॉरवर्डिंगवाल्या एसएमएस अलर्टवर लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मेसेजकडे दुर्लक्ष करू नका आणि सावध राहा.

Web Title: Do not ignore call forwarding message on your phone it may lead big cyber scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Cyber Fraud
  • cyber scam
  • Tech News

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.