JioHotstar ने रचला इतिहास! 45.1 करोड अॅक्टिव मंथली यूजर्ससह बनला भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म
आकाश अंबानी यांनी सांगितलं आहे की, जिओहॉटस्टारमध्ये त्यांनी कंटेंट कॉमर्स मॉडेल तयार केला आहे, जे यूजर्सससाठी एक बाजारपेठ उपलब्ध करून देते. हे यूजर्सना अॅपमधून बाहेर न पडताच त्यांच्या आवडीचा कंटेट पाहण्यासोबतच शॉपिंगचा अनुभव देखील ऑफर करतात. आयपीएल मॅचच्या लाईव्ह स्ट्रिमिंगसह यूजर्स स्वीगी अॅपमधून जेवण देखील ऑर्डर करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
त्यांनी असं सांगितलं की, जिओहॉटस्टारची लाईव्ह स्ट्रिमिंग क्षमता ग्लोबल बेंचमार्क सेट करत आहे. टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओहॉटस्टारवरून 7.25 करोड यूजर्सनी पाहिले. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याव्यतिरिक्त, आकाश अंबानी यांनी सांगितलं की, अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएलदरम्यान जिओहॉटस्टारने सुमारे 70 करोड यूजर्स जोडले आहेत. टेलीविजन एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये देखील रिलायंसचा दबदबा कायम आहे. त्यांनी सांगितलं आहे की, जिओस्टारचा प्रेक्षकसंख्येत 34.7 टक्के वाटा आहे. कंपनीचे नेटवर्क विविध भाषा आणि प्रकारांमध्ये दररोज 38.9 करोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.
आकाश अंबानी म्हणाले की, आर्थिक वर्ष 2026 मध्ये रिलाअंसच्या मालकीचे मीडिया बिजनेस जिओस्टारने चांगली कामगिरी केली. रिलायन्सच्या एकत्रित मीडिया व्यवसायांनी गेल्या आर्थिक वर्षात 34,917 करोड रुपयांचा महसूल मिळवला. या कालावधीत कंपनीचा EBITDA 5,842 करोड रुपये आणि निव्वळ नफा 3,434 करोड रुपये होता.
गेल्या काही महिन्यांत जिओहॉटस्टारची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवडत्या वेब सिरीज, चित्रपट, कार्यक्रम आणि कार्टून हा सर्व कंटेट जिओहॉटस्टारवर एका क्लिकवर उपलब्ध असतो. याशिवाय, यूजर्स लाईव्ह क्रिकेट सामन्यांचा देखील आनंद घेऊन शकतात. तसेच अनेक टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते, ज्यामुळे यूजर्सना जास्तीचे पैसे खर्च करून सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची गरज पडत नाही.






