Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Starlink ने भारतात ठेवलं पहिलं पाऊल! आता भारतीयांना थेट सॅटेलाईटद्वारे मिळणार इंटरनेट, एलन मस्कने मुंबईत आयोजित केला डेमो!

स्टारलिंक लवकरच भारतात एंट्री करणार आहे. याची तयारी देखील आता सुरु झाली आहे. मुंबईत स्टारलिंकचे डेमो सत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्टारलिंकच्या एंट्रीसाठी भारतीय प्रचंड आनंदी आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2025 | 10:19 AM
Starlink ने भारतात ठेवलं पहिलं पाऊल! आता भारतीयांना थेट सॅटेलाईटद्वारे मिळणार इंटरनेट, एलन मस्कने मुंबईत आयोजित केला डेमो!

Starlink ने भारतात ठेवलं पहिलं पाऊल! आता भारतीयांना थेट सॅटेलाईटद्वारे मिळणार इंटरनेट, एलन मस्कने मुंबईत आयोजित केला डेमो!

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईत आयोजित केले स्टारलिंकचे डेमो सत्र
  • युजर्सना मिळू शकते 25एमबीपीएस पर्यंत इंटरनेट स्पीड
  • भारतातील लाँचिंगसाठी कंपनीची जोरदार तयारी सुरु
एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सर्विस कंपनी स्टारलिंक भारतात लवकरच त्यांची सेवा सुरु करणार आहे. यासाठी कंपनीने प्रयत्न देखील सुरु केले आहेत. भारतीय सरकारच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करून मस्कला भारतात त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करावी लागणार आहे. भारतातील स्टारलिंकच्या लाँचिंगबाबत सतत अपडेट्स येत असतात. आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. हे अपडेट युजर्ससाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारतात कंपनीने 30 आणि 31 ऑक्टोबर या दोन दिवशी स्टारलिंकच्या डेमोचे आयोजन केले आहे. मुंबई शहरात हे आयोजन करण्यात आले आहे.

Nothing Phone 3a Lite: अखेर प्रतिक्षा संपली! नथिंगच्या स्मार्टफोनची झाली एंट्री, Glyph लाईट आणि आकर्षक डिझाईनने जिंकलं युजर्सचं मन

मुंबई बनणार भारतातील प्रमुख हब

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात स्टारलिंकने पहिलं पाऊल ठेवलं आहे. कंपनीने सॅटेलाईट इंटरनेटचा डेमो देखील आयोजित केला आहे. भारतात नवीन सेवा सुरु करण्यासाठी हा पहिला मोठा प्रयत्न आहे. डेमोसाठी कंपनीने मुंबईतील अंधेरी ईस्‍टमध्ये 1294 स्‍क्वेअर फुटचे ऑफ‍िस घेतले आहे. या ऑफीसमधून पुढीस 5 वर्षे कंपनी त्यांचं काम करणार आहे. यासोबतच कंपनी मुंबईत एकच ट्रायल करत आहे, ज्यामध्ये स्‍टारलिंकच्या टेक्‍नॉलजीद्वारे सामान्य माणसांना आणि व्हिआपी लोकांना ही सेवा कशी पुरवली जाणार आहे, याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

रिपोर्टनुसार, कंपनी मुंबईला त्यांचं हब बनवून संपूर्ण देश ऑपरेट करण्याची तयारी करत आहे. स्टारलिंक भारतातील 9 शहरांत सॅटेलाईट स्टेशनची उभारणी करणार आहे, ज्यामध्ये मुंबईचा देखील समावेश आहे. डेमोदरम्यान कंपनी प्रोविजनल स्पेक्ट्रमचा वापर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे स्पेक्ट्रम कंपनीला तात्पुरते वापरण्यासाठी देण्यात आला आहे. सरकारी तपास संस्था आयोजित करण्यात आलेल्या या डेमोवर नजर ठेवणार आहे. हा डेमो स्टारलिंकची भारतात सर्विस सुरु करण्यासाठी रेगुलेटरी क्लियरेंसचे मोठे पाऊल आहे.

डेमो का गरजेचं आहे?

स्टारलिंकच्या डेमोदरम्यान, पोलीस आणि सायबर सिक्योरिटी सारख्या सरकारी संथ्या याच्या डेटा एनक्रिप्शन, यूजर ट्रॅकिंग आणि दूसऱ्या सुरक्षा तपासणीची तीव्रतेची चाचणी करणार आहे. यासोबतच स्टारलिंकचे कनेक्शन स्टेबिलिटी, इंटरनेट स्पीड, लेटेंसी आणि कनेक्टिविटीची देखील चाचणी केली जाणार आहे.

OpenAI च्या ChatGPT Atlas AI ब्राऊझरचे टॉप फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण, क्रोमला टक्कर देण्यासाठी झाले सज्ज

स्टारलिंकचा कोणत्या युजर्सना होणार फायदा?

एलन मस्कच्या कंपनीने दावा केला आहे, भारताच्या दुर्गम भागात इंटरनेटचा वापर सुलभ होणार आहे. सॅटेलाईट इंटरनेट अशा भागांत हाय स्पीड इंटरनेट सर्विस ऑफर करणार आहे, जिथे आतापर्यंत कोणतेही नेटवर्क पोहोचणं अशक्य होतं. इंटरनेटच्या आगमनामुळे दुर्गम भागातील लोकांना ऑनलाइन सेवा, टेलिमेडिसिन आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध होतील. शिवाय, भारतीय दूरसंचार बाजारपेठेत एका नवीन खेळाडूच्या प्रवेशामुळे स्वस्त इंटरनेट सुविधा मिळू शकते.

FAQs (संबंधित प्रश्न)

स्टारलिंक भारतातील किती शहरांत सॅटेलाईट स्टेशनची उभारणी करणार आहे?
9 शहरांत

स्टारलिंकसाठी सर्वात महत्त्वाची अट कोणती?
कंपनीला गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळत नाही तोपर्यंत फक्त भारतीय नागरिकच सॅटेलाईट स्टेशन चालवतील

स्टारलिंकचा युजर्सना कोणता फायदा होणार?
हाय-स्पीड इंटरनेट मिळणार

Web Title: Elon musk company starlink organized first demo of satellite internet in mumbai tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर
1

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर

Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये
2

Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये

आता येणार खरी मजा! ही टेक कंपनी तोडणार सर्व रेकॉर्ड्स, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीसह लाँच करणार स्मार्टफोन
3

आता येणार खरी मजा! ही टेक कंपनी तोडणार सर्व रेकॉर्ड्स, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीसह लाँच करणार स्मार्टफोन

YouTube ने हे प्रसिद्ध भारतीय चॅनल केलं बॅन, AI-जनरेटेड मूवी ट्रेलर आणि असे होते व्हिडीओ; जाणून घ्या सविस्तर
4

YouTube ने हे प्रसिद्ध भारतीय चॅनल केलं बॅन, AI-जनरेटेड मूवी ट्रेलर आणि असे होते व्हिडीओ; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.