Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!

Grokipedia vs Wikipedia: Grokipedia 1.0 नक्की आहे तरी काय आणि कधी लाँच होणार? याबाबत युजर्स प्रचंड उत्सुकता आहे. एलन मस्क Grokipedia 1.0 लवकरच लाँच करणार आहे. एलन मस्कचे Grokipedia 1.0 विकीपीडीयाला टक्कर देणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2025 | 11:24 AM
Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!

Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!

Follow Us
Close
Follow Us:
  • विकिपीडियाला टक्कर देण्यासाठी एलन मस्क झाला सज्ज
  • लवकरच लाँच होणार Grokipedia 1.0
  • एक्सवर शेअर केली पोस्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक एलन मस्क ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया Grokipedia लाँच करण्याची तयारी करत आहे. Grokipedia हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे जगातील लोकप्रिय इनसाइक्लोपीडिया असलेल्या आणि इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म Wikipedia ला टक्कर देणार आहे. Grokipedia मस्कची AI कंपनी xAI वर आधारित असणार आहे, जी सध्या चॅटबॉट Grok AI आणि इतर AI प्रोडक्ट चालवते. Grokipedia च्या नावावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हे चॅटबोट Grok सोबत कनेक्ट असणार आहे. हे इंटरनेट आणि दुसऱ्या सोर्सद्वारे माहिती साठवणार आहे. एलन मस्कने अशी घोषणा केली आहे की, तो लवकरच Grokipedia 1.0 लाँच करणार आहे.

Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps

Grokipedia 1.0 कधी होणार लाँच?

Elon Musk ने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पुष्टी करण्यात आली आहे की, Grokipedia 1.0 लवकरच लाँच केला जाणार आहे. सर्वात आधी या प्लॅटफॉर्मचे बीटा वर्जन लाँच केलं जाणार आहे. त्यांनी Grokipedia बद्दलच्या पोस्टमध्ये नवीन प्लॅटफॉर्मबद्दल काही माहिती शेअर केली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Grokipedia माणसं आणि AI साठी जगातील सर्वात मोठा आणि अचूक माहितीचा सोर्स असणार आहे. तसेच याचा वापर करण्यासाठी कोणतीही मर्यादा सेट केली जाणार नाही. एलन मस्क Wikipedia वर वेळोवेळी टीका करत असतो. तसेच त्याने विकिपीडियाच्या नॉन-प्रॉफिट संस्था असण्यावर देखील एक प्रश्न उपस्थित केला आहे. यासोबतच, मस्कने असा देखील आरोप केला आहे की विकिपीडियावरील कंटेंट डाव्या विचारांना प्रतिबिंबित करते.

Why the world needs Grokipedia? ➤ Wikipedia isn’t the neutral source of truth it once was. It’s been taken over by far-left activists and often used as a propaganda tool, not an unbiased encyclopedia. ➤ A lot of AIs today get their info from the internet, but the web is full… pic.twitter.com/nuwQ65diWM — DogeDesigner (@cb_doge) October 4, 2025

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये या संपूर्ण जागाला इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म Grokipedia 1.0 ची गरज का आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. ग्रोकिपीडिया हा एक मुक्त-स्रोत विश्वकोश असेल जो केवळ सत्यावर केंद्रित असेल, असं देखील पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

Wikipedia ला टक्क देण्यासाठी मस्क सज्ज

एलन मस्कचं असं म्हणणं आहे की, इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म Grokipedia 1.0 या महिन्याच्या शेवटी लाँच केलं जाऊ शकतं. अशी शक्यता आहे की, येत्या काही दिवसांत या प्लॅटफॉर्मबाबत अधिक माहिती जारी केली जाऊ शकते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म ग्रोक प्रीमियम सबस्क्रिप्शनसह अ‍ॅक्सेस करता येते. एलन मस्क म्हणतात की त्यांचे प्लॅटफॉर्म अचूक आणि निःपक्षपाती कंटेंट प्रदान करेल.

FAQs (संबंधित प्रश्न)

विकिपीडिया नक्की आहे तरी काय?
विकिपीडिया एक ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया आहे.

विकिपीडिया कधी लाँच करण्यात आलं आहे?
2001

विकिपीडिया किती भाषांमध्ये उपलब्ध आहे?
300

Web Title: Elon musk is planning to launch grokipedia 10 which will compete with wikipedia tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps
1

Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स झाले LIVE, फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी आत्ताच करा क्लेम
2

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स झाले LIVE, फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी आत्ताच करा क्लेम

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!
3

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या
4

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.