Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या
Vivo ने त्यांच्या V सीरीजमधील नवीन स्मार्टफोन Vivo V60e 5G भारतात लवकरच लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, त्याची तारीख अद्याप कंपनीने जाहिर केली नाही. मात्र या आगामी स्मार्टफोनचे टिझर सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!
Vivo V60e 5G च्या ऑफिशियल टीजरशिवाय या आगामी स्मार्टफोनची इतर माहिती देखील ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे आता अनेकजण कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनची तुलना मागील Vivo V50e 5G व्हेरिअंटसोबत करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, लवकरच लाँच केला जाणारा नवा स्मार्टफोन कंपनीने Vivo V50e 5G व्हेरिअंटपेक्षा खूप अपग्रेड केला आहे. आता आम्ही तुम्हाला दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vivo V60e 5G स्मार्टफोनची डिझाईन लाँचआधीच रिलीज करण्यात आली आहे. या आगामी स्मार्टफोनचे डिझाईन काही प्रमाणात Vivo V60e प्रमाणेच आहे. हा आगामी Vivo V60e 5G स्मार्टफोन पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल, ग्लॉसी रियर पॅनल आणि प्लास्टिक बिल्डसह लाँच केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Vivo V60e 5G मध्ये Vivo V50e 5G पेक्षा वेगळा कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे. Vivo V50 प्रमाणे, या फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 आणि IP69 रेटिंग देखील मिळते.
Vivo V60e मध्ये कंपनी 6.77-इंच OLED डिस्प्ले देणार आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राइटेस 1800 निट्स असण्याची शक्यता आहे. Vivo V50e स्मार्टफोनमध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राइटनेस 1300 निट्स आहे.
Vivo V60e बद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर दिला जाणार आहे. हा प्रोसेसर V50e 5G मध्ये देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB ची रॅम आणि 256GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. Vivo च्या अपकमिंग फोनमध्ये 6500mAh बॅटरी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर Vivo V50e मध्ये 5600mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 90W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo V60e 5G स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत 8MP चा अल्ट्रावाइड सेंसर देखील मिळतो. Vivo V50e 5G मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सल सेल्फी कैमरा देण्यात आला आहे.
Vivo V60e 5G स्मार्टफोन भारतात 28,749 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. Vivo V50e 5G बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन भारतात 26,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.