
एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ
सतत चर्चेत असणाऱ्या एलन मस्कची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा अॅपसाठी नाही. आता मस्कने एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. एलन मस्कने आता अधिकृतपणे Grokipedia लाँच केलं आहे. Wikipedia ला टक्कर देण्यासाठी AI-आधारित ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया मस्कने लाँच केलं आहे. Grokipedia लाईव्ह झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्येच क्रॅश झाले होते. मात्र आता सर्वजण ऑल न्यू Grokipedia चा वापर करू शकणार आहेत. लाँचिंगनंतर काही तासांतच Grokipedia ची क्रेझ सुरु झाली आहे.
Grokipedia ला मस्कने Wikipedia चा एक चांगला पर्याय म्हणून सादर केलं आहे. हे नवं प्लॅटफॉर्म ChatGPT, Gemini किंवा मस्कच्या Grok चॅटबॉटपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते. हे प्लॅटफॉर्म सामान्य संभाषणाच्या इंटरफेसऐवजी सर्च इंजिनप्रमाणे काम करते. या ठिकाणी युजर्सना केवळ एखाद्या विषयाचे नाव टाईप करायचे आहे. समजा, तुम्ही Paris टाइप केलं, तर तुम्हाला त्या शहराबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
https://t.co/op5s4ZiSwh version 0.1 is now live. Version 1.0 will be 10X better, but even at 0.1 it’s better than Wikipedia imo. — Elon Musk (@elonmusk) October 28, 2025
यूजर्स थेट Grokipedia.com ला भेट देऊन कोणत्याही विषयावरील माहिती शोधू शकणार आहेत. असं सांगितलं जात आहे की, अनेक आर्टिकल्सच्या खालील बाजूला एक नोट देखील पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये असं लिहीले असेल की, ‘The content is adapted from Wikipedia, licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.’ याचा अर्थ असा आहे की, Grokipedia वर आढळणारा बराच कंटेंट अजूनही Wikipedia वरून घेतला जात आहे.
सध्या Grokipedia कडे 8.85 लाख आर्टिकल्स आहेत, जे Wikipedia च्या तुलनेत अत्यंत कमी आहे. मात्र या नवीन प्लॅटफॉर्ममध्ये एक खासियत आहे. हे AI आणि कम्युनिटी दोन्हीकडील डेटा xAI एल्गोरिद्मद्वारे प्रोसेस करते, ज्यामुळे कंटेट अधिक अचूक आणि संरचित होतो. सध्या Grokipedia चे 0.1 वर्जन लाईव्ह आहे आणि यामध्ये सतत अपग्रेड केले जात आहे. मस्कने वचन दिलं आहे की, हे प्लॅटफॉर्म 1.0 वर्जनमध्ये 10 पट अधिक चांगला अनुभव देणार आहे. यूजर्स https://grokipedia.com वर जाऊन त्यांच्या X अकाऊंटने लॉगिन करू शकतात. याचा अद्याप कोणताही ऑफिशियल मोबाईल अॅप उपलब्ध नाही.
Wikimedia Foundation च्या प्रवक्त्या लॉरेन डिकिन्सन यांनी सांगितलं आहे की, Grokipedia ला देखील Wikipedia च्या अस्तित्वाची गरज आहे. Wikipedia ची नॉन-प्रॉफिट आणि Ad-Free पॉलिसी त्याला गेल्या अनेक दशकांपासून एक विश्वसनीय स्रोत बनवत आहे. त्यामुळे आता Grokipedia भविष्यात खरंच Wikipedia ला टक्कर देऊ शकणार का की हे प्लॅटफॉर्म केवळ एक AI-Powered वर्जनच राहिल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.