Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips
मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर 2025 ला HIBP ने Synthient Stealer Log Threat Data नावाने डेटासेट जोडला होता, ज्यामध्ये सुमारे 183 मिलियन यूनिक ईमेल एड्रेस आणि त्यांच्या पासवर्ड्सचा समावेश होता. हा डेटा Synthient LLC द्वारे एकत्रित करण्यात आला होता, यामध्ये Gmail यूजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात होती. HIBP च्या फाउंडरनी सांगितलं की, हा डेटा वेगवेगळ्या डिव्हाईसमधील इन्फोस्टीलर मालवेअरद्वारे चोरी करण्यात आला होता. या प्रकारचे मालवेयर केवळ लॉगिन क्रेडेंशियल्सच नाही तर ब्राउजर कुकीज आणि ऑथेंटिकेशन टोकनची माहिती देखील चोरतात. ज्यामुळे हॅकर्स पासवर्डशिवाय अकाऊंट अॅक्सेस करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या ईमेलचा पासवर्ड लीक झाला आहे की नाही याबाबत जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://haveibeenpwned.com/ वर जावे लागेल आणि इथे तुम्हाला तुमचा Gmail ID एंटर करावा लागणार आहे. जर तुमचे डिटेल्स लीक झाले असतील तर वेबसाईट तुम्हाला याबाबत माहिती देणार आहे.
सर्वात आधी, एक नवीन, मजबूत पासवर्ड तयार करा ज्यामध्ये अपरकेस अक्षरे (A-Z), लोअरकेस अक्षरे (a-z), संख्या आणि स्पेशल कॅरेक्टरचा समावेश असेल. यानंतर गुगलच्या Security Checkup सर्विसद्वारे अनोळखी डिव्हाईस, अॅप्स आणि अॅक्टिव्हिटी देखील तपासा. फक्त OTP च नाही तर हार्डवेअर सिक्युरिटी की किंवा पासकीचा देखील वापर करा.
Arratai च्या लोकप्रियतेनंतर आता Zoho ने Zoho Mail अॅप लाँच केले आहे. हे अॅप जिमेलला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. असे अनेक लोकं आहेत, ज्यांनी त्यांच अकाऊंट जिमेलवरून Zoho Mail अॅपवर स्विच केलं आहे. Gmail ची युजर्स संख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पासवर्ड लीक झाल्याच्या अहवालामुळे युजर्समध्ये खळबळ उडाली आहे.






