OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज
OnePlus 15 स्मार्टफोनसोबतच OnePlus Ace 6 स्मार्टफोन देखील चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. वनप्लसचा हा फोन भारतात OnePlus 15R च्या ब्रँडिंगसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Elite SoC ने सुसज्ज आहे, जो गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. OnePlus Ace 6 मध्ये 50 मेगापिक्सेल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
OnePlus Ace 6 स्मार्टफोन देखील 4 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB+ 256GB, 16GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,300 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,099 म्हणजेच सुमारे 38,800 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 42,200 रुपये आणि टॉप 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 3,899 म्हणजेच सुमारे 48,400 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन क्विकसिल्व्हर, फ्लॅश व्हाइट आणि ब्लॅक या तीन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. याची विक्री 30 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
OnePlus Ace 6 स्मार्टफोनमध्ये 6.83-इंचाचा 1.5K (1,272 x 2,800 पिक्सेल) फ्लॅट AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 165Hz पर्यंत आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 5,000 निट्स आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले 3D फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट, 16GB पर्यंत LPDDR5X Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच या फोनमध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी G2 गेमिंग चिप देखील दिली आहे. हा फोन Android 16 वर आधारित ColorOS 16 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी OnePlus Ace 6 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. यासोबतच या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
OnePlus चा हा फोन मेटल फ्रेमसह उपलब्ध आहे, जो IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंगला सपोर्ट करतो. OnePlus Ace 6 मध्ये कंपनीने Plus key बटन दिले आहे, ज्याच्या मदतीने युजर्स रिंग मोडमध्ये स्विच करू शकतात. यासोबतच या बटणाचा वापर कॅमेरा उघडण्यासाठी, ऑन-स्क्रीन टेक्स्ट ट्रांसलेशन करण्यासाठी, फ्लॅशलाइट ओपन करण्यासाठी कस्टमाइज केला जाऊ शकतो. OnePlus Ace 6 स्मार्टफोनमध्ये 7,800mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही या सेगमेंटीमधील सर्वात मोठी बॅटरी आहे. हा फोन 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग उपलब्ध नाही.






